पुण्यातील मोदींच्या सभेत ; मराठा तरुणाकडून “एक मराठा लाख मराठा” घोषणाबाजी.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज

पुणे:- अंतरवाली सराटी येथील पोलीसांच्या लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दीड वर्षांपासून आरक्षणाची लढाई मोठ्या हिंमतीने लढली आहे. त्यामुळे, संपूर्ण राज्यभरातील मराठा एक झाला असून मराठा आरक्षणासाठी आपलं योगदान देत आहे. त्यातूनच पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एका मराठा बांधवाने घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लक्ष वेधले. मराठा आरक्षण भेटलच पाहिजे म्हणत पिवळ्या रंगाचं जॅकेट घातलेला  कार्यकर्ता आक्रमक झाल्याने पोलिसांची व सुरक्षा रक्षकांची चांगलीच धांदल उडाली होती. विशेष म्हणजे पुण्यातील मोदींच्या सभेला मोठी गर्दी झाली होती, आणि हा कार्यकर्ता व्हीव्हीआयपी रांगेत बसलेला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना पोलिसांनी त्या व्यक्तीला आवरलं आणि त्याला खाली बसायची विनंती केली होती. मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागल्याचं दिसून आलं. त्यामुळे, अखेर पोलीस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन संबंधित व्यक्तीला शांत करुन सभास्थळापासून दूर नेहले. मात्र, या प्रसंगामुळे सभेतील व्हीव्हीआयपी रांगेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल होतं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आजचा दुसरा दौरा पुण्यामध्ये होता. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदार संघात पहिली सभा झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी सोलापूर मधील सभेतून ही काँग्रेसवर हल्लाबोल केला.

त्यानंतर, पुणे शहरातून महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत कलम ३७० वरुन काँग्रेसवर यावेळी त्यांनी निशाणा साधला. पुण्यातील एसपी कॉलेज मैदानात नरेंद्र मोदींची सभा होत असताना एका मराठा बांधवाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला. सभास्थळी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु असताना व्हीव्हीआयपी रांगेत काही प्रमाणत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. एक मराठा कार्यकर्ता उठला आणि ” एक मराठा लाख मराठा” घोषणा देत त्याने सर्वांचं लक्ष वेधलं.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool