जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर :- विधानसभेच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील प्रचाराचे वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत असतानाच त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ज्याची ओळख आहे त्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नुकतेच भाजपमधून पक्ष प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत तसेच अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत आणि शरद चंद्र पवार पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले प्रवीण भैया माने हे अपक्ष म्हणून किटली या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.त्यामुळे या तालुक्यातील विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची झाली असल्याचे चित्र संपूर्ण इंदापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
त्यातच इंदापूर तालुक्याचा विकास शेजारील असणाऱ्या बारामती तालुक्याइतका का झाला नाही हे सर्वांना मान्य करावचं लागेल कारण इंदापूर तालुक्यात अशा अनेक समस्या आहेत त्या आत्तापर्यंत आजी-माजी आमदारांना मंत्रीपद मिळून सुद्धा सोडवता आलेल्या नाहीत.त्यामध्ये प्रामुख्याने इंदापूर तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यासाठी संपूर्ण सोयी सुविधांयुक्त अद्यावत अशी हॉस्पिटलची निर्मिती आजपर्यंत करता आली नाही त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनतेला शेजारील असणाऱ्या बारामती तालुक्यात हॉस्पिटल संबंधित गोष्टींसाठी जावं लागत आहे ही सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवन येथे 100 बेडचे ट्रामा केअर सेंटर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलं मात्र त्या ड्रामा केअर सेंटरला अदयापपर्यंत पुरेशा प्रमाणात डॉक्टर तसेच कर्मचारी नसल्याने तेथील नागरिकांना आरोग्याचा सामना हा रोज करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ,येथील आसणारा रोजगाराचा प्रश्न हा येथील तरुणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामध्ये पुणे सोलापूर हायवे वरील लोणी येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून एमआयडीसी मंजूर झाली त्यानंतर 2014 साली सत्ता परिवर्तन होऊन तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे हे झाले त्यानंतर 2019 साली सुद्धा दत्तात्रय मामा भरणे हेच आमदार झाले परंतु एमआयडीसीमध्ये ज्या प्रमाणात कंपन्या येऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात निर्माण न झाल्याने इंदापूर तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी शेजारील असणाऱ्या बारामती तालूक्यावरती विसंबून राहावं लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश तरुण वर्ग हा रोजगारासाठी बारामती येथील एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये जात आसल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे.
तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तालुक्यातील तरूण तरुणींच्या शिक्षणाचा प्रश्न हा सुद्धा अजून पर्यंत तालुक्यातील आजी- माजी आमदारांना सोडवता आलेला नाही त्यामध्ये मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज व इतर उच्च शिक्षण घेण्यासाठी असणारी कॉलेजेस ही इंदापूर तालुक्यात निर्माण व्हायला हवी होती परंतु ते सुद्धा होताना दिसले नाही. त्यामुळे शिक्षणासाठी सुद्धा शेजारील आसणाऱ्या बारामती तालुक्यावरती विसंबून राहवं लागत आहे.
चौथा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न, हा बारमाही 22 गावांचा प्रश्न सुद्धा आजपर्यंत सुटला गेला नाही त्यामुळे येथील असणारा शेतकरीवर्ग हा बारमाही पाण्यापासून आजपर्यंत वंचितच राहिलेला आहे कारण त्याला खडकवासला कॅनॉलचं पाणी हे शेतीला मिळत असतं परंतु ते शेवटच्या टोकापर्यंत कधी व्यवस्थीत पोहचतचं नाही तसेच ते पाणी सुध्दा आठमाहीच मिळतं आता तर पुण्याची लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांचं पाणी कमी होऊन पुणे शहराला पिण्यासाठी आरक्षित झालं आहे.
त्यामुळे यावरती उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी तेथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करायला हवं होतं परंतु ते सुद्धा होताना दिसले नाही. त्यामुळे प्रचारकाळात वयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हे या प्रश्नांवरती लक्ष देऊन आपल्या प्रचारात सदरचे मुद्दे घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम करणार आहेत का ? असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील जनता आता विचारु लागली आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह