शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी , तब्बल १६५ दिवस अमरण उपोषण करणाऱ्या,भगवानराव खारतोडेंचा ; इंदापूर विधानसभेसाठी, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल..!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

इंदापूरः- इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बहुचर्चित असणारा मतदारसंघ म्हणून या मतदार संघाची ओळख, त्यातच काही दिवसांपूर्वी भाजपमधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पक्षाने अधिकृत रित्या उमेदवारी जाहीर केल्याने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नाराज झालेले नेते तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण भैया माने तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी प्रखर विरोध केल्यानंतर सुद्धा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाच पक्षाने अधिकृतरित्या उमेदवारी जाहिर केली व त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेंस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छूक आसणारे नेते तथा पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण भैया माने यांनी आपली वेगळी चूल मांडत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यातच अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार दत्तात्रय मामा भरणेंना पक्षाकडून विधानसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर वरील तीन्ही उमेदवारांच्यातच अटीतटीची लढत होणार असे चित्र संपूर्ण इंदापूर तालुक्यात झाले असतानाचं,त्यातचं इंदापूर तालुक्यात नवीन व्टीस्ट पाहावयास मिळाला आहे , त्यामध्ये इंदापूर तालुक्यात चौथ्या उमेदवाराची ही चर्चा रंगताना दिसत होती.

ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी सतत टोकाचा संघर्ष करणारे व शेतकऱ्यांसाठी १६५ रात्रंदिवस उपोषण करणारे भगवानराव खारतोडे होय,त्यांनी सुद्धा शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या  म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी इंदापूर येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याणराव पांढरे तसेच तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समक्ष त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी पूनम खारतोडे तसेच त्यांचे आई-वडील तसेच त्यांना आंदोलनात साथ देणारा शेतकरी राजा व तरुण वर्ग हा मोठया संख्येने यावेळी उपस्थित होता.

इंदापूर विधानसभेसाठी इंदापूर तालुक्यातील मतदार राजा कोणाच्या अंगावर विजयाचा गुलाल टाकणार ते २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर , व २३ नोव्हेंबरला मतमोजणी झाल्यानंतरच  समजणार आहे तो पर्यंत प्रत्येक उमेदवाराकडून संपूर्ण इंदापूर तालुक्यात प्रचाराच्या धुरळ्याची राळ ही उडतच राहणार आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें