जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
दौंड : – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुचर्चित आसणारा एक मतदार संघ म्हणजे दौंड मतदार संघ येतो. कुरकुंभ एमआयडीसी तसेच मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती तसेच चार साखर कारखान्यामुळे विकसीत परिसर असलेल्या या दौंड तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण असा परिसर आहे. माजी आमदार आसणारे रमेश थोरात यांना यावेळी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश थोरात यांची गेली 40 वर्षापासून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून दौंड तालुका मतदारसंघात पकड आहे.
त्यांचा प्रवास हा खुटबावचे सरपंच ते दौंडचे आमदार असा राहिलेला आहे. तसेच त्यांनी अनेक वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. व सध्या ते बँकेत विद्यमान संचालक ही आहेत. आता पाचव्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात असून भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या सोबत त्यांचा सामना होणार आहे. विद्यमान व माजी आमदार असा हा सामना दौंड तालुक्यात रंगणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारेल हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
एक महिण्यापासून दौंड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून कोणाला संधी मिळणार यावरून मोठे घमासान सुरू होते. आज अखेर यावर तोडगा निघाला असून माजी आमदार रमेश थोरात यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँगेस मध्ये प्रवेश केल्याने लगेच त्यांना ए बी फॉर्म दिला आहे.
दौंड मतदार संघातून रमेश थोरात यांनी सोमवार दिनांक 28 रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार रमेश थोरात यांनी दौंड शहरातून छत्रपती शाहू महाराज स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत रॅली काढत. तसेच त्यांनी शेवटी दौंडच्या चौकात सभा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन ही केले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह