जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
दौंडः – पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड तालुका दौंड येथे 2 एसटी बसची समोरासमोर धडक होवून भीषण असा अपघात झाला आहे. यामध्ये एक महिला जागेवर मयत तर काही गंभीर आणि काही किरकोळ असे तब्बल 69 प्रवासी जखमी झाले आहेत .सोमवार दिनांक 28 रोजी दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास सदरचा अपघात घडला आहे.
महामार्ग जामखेड ते पुणे ही एसटी बस (MH 11 BL 9411) जामखेडहून पुण्याकडे जात होती.तर पुणे-तुळजापुर एसटी बस ( MH 14 BT 3379) तुळजापूरच्या दिशेने चालली होती. दुपारी 1:15 वाजताच्या दरम्यान वरवंड येथील कौठी मळा या भागात पुण्याकडे जाणारी जामखेड एसटी अचानक दुभाजक ओलांडून पलीकडच्या मार्गावर गेली.त्याचवेळी समोरुन तुळजापुरला जाणारी एसटी जात होती.या 2 एसटी बसची समोरासमोर धडक होवून भीषण असा अपघात झाला आहे .जामखेड एसटी बसच्या अपघाता नंतर महामार्ग सोडुन काही अंतर उत्तर दिशेला जावून बस थांबली. 2 एसटी बसमध्ये एकुण 105 प्रवासी होते.
या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव सुवर्णा व्होले राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे असे आहे.दोन ही एसटी बसमध्ये रक्ताचा पडलेला सडा, तसेच अडकलेले प्रवासी, प्रवाशांचा रडणे-ओरडण्याचा आवाज या भयानक दृष्याने परिसरातील नागरीकांचे अक्षरशा काळीज पिळवटून गेले होते .यावेळी तत्काळ उपस्थीत झालेल्या तब्बल 10 ते 12 रुग्णवाहीकात जखमींना उपचारासाठी दौंड तालुक्यातील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तसेच सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.सोमवार दिनांक 28 रोजी दोन एसटी बसच्या अपघातानं संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह