मराठा आरक्षणासाठी,तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; सदरील घटना बीड जिल्हयातील.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

बीड :- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून निवडणूकांचा कार्यक्रमांची घोषणा होऊन आचारसंहिता लागली पण मराठा समाजाकडून 50 टककेच्याआतून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आसताना सुद्धा विधानसभेच्या निवडणूकांच्या आगोदर हा प्रश्न सुटला गेला नाही त्यातच आता आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील तरूण आत्महत्येसारखे शेवटचे पर्याय वापरू लागले आहेत अशीच एक घटना बीड जिल्हयात घडली आहे मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने शेवटचं टोकाचं पाऊल उचलले आहे.

गणेश अण्णासाहेब काळे राहणार गोळेगाव, तालुका गेवराई जिल्हा बीड असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आसून.मागील एक वर्षापासून मराठा आरक्षणाबाबत मराठा समाज तसेच मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. माञ, राज्य सरकारकडून 50 टक्केच्या आतमधून मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्याने तसेच निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने , त्यातचं मराठा समाजाला 50 टक्केच्या आतून आरक्षण  मिळाल् नसल्याकारणाने त्याने मी गणेश काळे फासी घेत आहे. अशी चिठ्ठी लिहून स्वतःला गळफास लावून त्याने त्याची जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेनंतर मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना अवाहन केलं आहे की, आपण आसे टोकाचं पाऊल उचलू नका जेणेकरून आपले आईवडील बायका पोरं आपण घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे उघडी पडू नयेत आज ना उदया आपल्याला ते आरक्षण भेटलचं परंतू एकदा तुमचा गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे आपण संयम पाळावा असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai