जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्रच सर्व पक्षांचे नेते हे जोरदार कामाला लागले आहेत. यात महाविकास आघाडी व महायुती पक्षासह इतर पक्षांच्याही उमेदवारांच्या याद्या आता जवळपास जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यातच तिकीट मिळत नसल्याने अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यातच आज २५ ऑक्टोबर रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक तासामध्ये ४ मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश पार पडले आहेत. तसेच पक्ष प्रवेश होताच त्यांना उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांचा महाविकास आघाडीला हा अप्रत्यक्ष इशारा असल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
कोणा कोणाचा पक्षप्रवेश पार पडला?
सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील, आमदार झिशान सिद्दिकी, सांगलीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश सोहळा पार पडला. तर पक्ष प्रवेश पार पडल्यानंतर लगेचच या चार ही नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना लगेच उमेदवारी जाहीर केली आहे.या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाची ताकत वाढल्याचे चित्र दिसत आहे .
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह