जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर :- इंदापूर मतदारसंघातील निवडणूक जाहीर होण्याच्या आगोदरच भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतलेले भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार समाचार घेतला आहे. निमित्त होतं दत्तात्रय भरणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांनी आम्हाला लोकसभा निवडणुकीत आश्वासने दिली होती. तसेच त्यांच्या घरी आम्हाला बोलावले होते. त्यांनी आम्हाला जेवू घातले, पण प्रत्यक्षात मात्र अदृश्य हात ‘तुतारी’साठी वापरला, असे तुम्ही म्हणत असाल, तर ही गोष्ट कोणत्या नैतिकतेच्या चौकटीत बसते? ज्या पक्षांमध्ये आपण असतो त्या पक्षाचेही आपण काम करीत नाही. तर अशा दलबदलू नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवालचं अजित पवार यांनी यावेळी केला आहे. तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांच्यात होणार आहे. मात्र इंदापूर तालुक्यातील मतदार राजा विजयाचा गुलाल कोणाच्या पारड्यात टाकतो हे 23 तारखेलाचं समजणार आहे.
अजित पवार बोलताना म्हणाले की,विधान परिषदच्या 12 जागा भरायच्या होत्या. मात्र त्यामधील 7 जागा भरल्या आहे. त्यातील पाच जागा राहिल्या आहेत. भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलं होते. आम्ही हर्षवर्धन पाटील यांना त्यामध्ये विधान परिषदेची आमदारकी देणार होतो. मात्र त्यांची थांबायची तयारीच नव्हती, आता व्याजासहीत वसूल करा. तसेच आपल्या मामाला घडयाळ चिन्हाच्या समोरील बटण दाबून प्रचंड मताने विजयी करा असे अवाहन यावेळी त्यांनी केले.
हर्षवर्धन पाटलांना आम्ही राज्यपाल करणार होतो, असे सांगत अजित पवार यांनी त्यांचा उल्लेख ‘दलबदलू’ असा केला आहे. तुम्ही चार-चार वेळा निवडून आला पण इंदापूर तालुक्याचा विकास का केला नाही, अशी टीका ही अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह