जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
भोर:- सोयाबीन भरडत आसताना सोयाबीन भरडी मशीनच्या एक्सेल मध्ये महिलेच्या साडीचा पदर अडकल्यामुळे महिला पूर्णपणे मशीनमध्ये ओढली गेल्याने चिरडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार दिनांक २३ रोजी भोर तालुक्यातील कुसगाव येथे घडली आहे.
रंजना दत्तात्रय गोरे (वय ३५ वर्ष ) राहणार भोर असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे माहेर भोर-महाड रस्त्यावर धामनदेववाडी येथील आहे. रंजना या घरासमोर सोयाबीन भरडण्याकरिता गेल्या असताना सोयाबीन मशीन चालू झाल्यानंतर रंजना यांचा साडीचा पदर सोयाबीन भरडी मशीनमध्ये अडकल्याने. तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने भोर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यादरम्यान रंजना हया सोयाबीन भरडत असताना भरडी मशीनमध्ये त्यांना ओढले गेले असताना, त्यांच्या शरीराला मोठमोठ्या गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच रंजना यांना मशीन मधून बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी सदरील महिलेस मृत घोषित केले आहे. अधिकचा तपास हे राजगड पोलीस करीत आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह