जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर:- जिल्हा परिषद सदस्य तथा सोनाई ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रविण माने यांनी मोठं शक्ति प्रदर्शन करत आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आज रोजी दाखल केला आहे. नाराज झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर येथील नेते प्रवीण माने तसेच जिल्हा बँकेचे संचालक तसेच मार्केट कमिटीचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी ऐनवेळी पक्षाने हर्षवर्धन पाटील यांना तिकीट दिल्यानं बंडाचे निशाण फडकावले आहे.या जोडीतील प्रवीण माने यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज आज रोजी दाखल केला आहे.
अर्ज दाखल करण्याअगोदर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना प्रवीण माने हे भावनिक झाले असल्याचे पहावयास मिळाले तसेच त्यांचे अश्रू ही अनावर झाले होते. व्यासपीठावर असलेले त्यांचे वडील म्हणजे सोनाई ग्रुपचे चेअरमन दशरथ माने व कार्यकर्त्यांमध्ये बसलेल्या त्यांच्या मातोश्री यांना सुद्धा यावेळी रडू कोसळलं होते.यावेळी प्रवीण माने म्हणाले आहेत, की आपण यंदा कोणत्याही स्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे.
11 ऑक्टोंबरला आपला मेळावा झाल्यानंतर आम्ही विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यामध्ये सर्वांनी एकमताने सांगितले की, तुम्ही निवडणूक लढवलीचं पाहिजे. आपल्या समोर शरदचंद्र पवारांचा पक्ष आहे तसेच दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा पक्ष आहे. त्यांच्याकडे मोठंमोठे नेते आहेत, तसेच त्यांचे संघटन मोठे आहे, तसेच गावोगावी त्यांच्याकडे पुढारी आहेत. आपल्याकडे फक्त तुमच्यासारखी सामान्य जनता आहे. याच जनतेच्या ताकदीच्या जोरावर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहोत, असे प्रवीण माने यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
तसेच ते पुढे म्हणाले की,आज सकाळी मी लवकर घरातून बाहेर पडलो आणि आमच्या कुलदैवत व विविध देवांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. परंतू घरातून बाहेर जाताना घरी कोणीही नव्हतं, पण मी जेव्हा दर्शन घेऊन घरी आलो तेव्हा माझी गाडी सुद्धा आमच्या गेटमधून आत जात नव्हती इतकी प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. लोकांचं हेच प्रेम बघून माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं, जाहीर सभेत हा प्रसंग सांगताना प्रवीण माने हे भावूक झाले होते तसेच ते हुंदका देऊन रडू लागले. त्यानंतर उपस्थित आसणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रवीण माने तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है। अशा घोषणा देत प्रवीण माने यांना मोठा आधार दिला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह