75 हजार रुपयांच्या लाचप्रकरणात ; लाचखोर महिला उपअधीक्षक ACB च्या जाळ्यात.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

खंडाळाः- शासन अधिकाऱ्यांना दर महिण्याला चांगल्या प्रकारचा पगार तसेच वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते हे नेहमी देत असते परंतू काही लाचखोर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना गोरगरीब जनतेच्या माना मुरगळून पैसे कमावण्याचं एक प्रकारचे व्यसनचं जणूकाही लागल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे , सातारा जिल्हयातील खंडाळा येथील आसणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयामधील उपअधीक्षक दर्जाच्या आसणाऱ्या अधिकारी उर्मिला अशोक गलांडे (वय 47 वर्षे) यांच्यासह त्यांच्याचं कार्यालयात काम करत असणाऱ्या त्यांच्या सहकारी कंत्राटी प्रशिक्षणार्थी साक्षी शिवाजी उमाप (वय 28 वर्षे ) या दोघींना लाच प्रकरणात अँटी करप्शन ब्युरो सातारा यांनी रंगेहात लाच घेताना पकडले असून त्यानंतर त्यांना अटक ही करण्यात आली असून त्यांच्यावर खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हयातील महसूल प्रशासनात या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली दिसून येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराने लोणंद येथील सिटी सर्व्हे नंबर 177/428 या त्यांच्या मिळकती वरील सत्ता प्रकार बदलण्यासाठी अर्ज सादर केला होता,ज्यासाठी उपअधीक्षक गलांडे यांनी 1 लाख रुपये लाचेची मागणी ही तक्रारदार यांच्याकडे केली होती. तडजोडी अंती रक्कम 75 हजार रुपये ठरविण्यात आली होती.सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, यामध्ये पो.हवा. नितीन गोगावले, पो.कॉ. विक्रमसिंह कणसे, म.पो.कॉ. स्नेहल गुरव, आणि चा.पो.हवा. अजित देवकर यांनी सहभाग घेतला होता.

भुमी अभिलेख उपअधीक्षक उर्मिला अशोक गलांडे यांच्यावरची त्यांच्या कार्यकाळातील ही दुसरी कारवाई आहे, भूमी अभिलेख खात्यामध्ये काम करत असणाऱ्या उपअधीक्षक उर्मिला अशोक गलांडे यांच्यावर दौंड येथील भुमी अभिलेख कार्यालयात  सुद्धा पुर्वी लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये त्यांना निर्दोष देखील करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. तसेच अँन्टी करप्शन ब्यूरो सातारा यांनी जनतेस अवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणताही सरकारी अधिकारी , कर्मचारी पैशांची मागणी करत असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यात यावा.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai