निवडून येणाऱ्या जागांची खात्री आसणाऱ्या ठिकाणी उमेदवार देणारचं ; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

जालनाः– ज्या ज्या मतदारसंघात आपले उमेदवार निवडून येतील तिथे उमेदवार उभे करू आणि जिथे निवडून येण्याची शक्यता कमी आहे, अशा मतदारसंघात जो उमेदवार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी भूमिका जरांगे पाटील यांनी रविवार रोजी झालेल्या बैठकीमध्ये मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी बैठकी बाबत एक महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे.

अगोदर आम्ही महाराष्ट्रातील इच्छुकांची बैठक घेतली होती, ती निवडणूक लढवावी की पाडायचे यासाठी होती. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं, एका मतदारसंघात एकच उमेदवार द्या, तुमच्या मतदारसंघात तुमच्या बैठका घ्या. येत्या 24 तारखेला अंतरवाली सराटीत जिल्ह्यानिहाय विभागांची बैठक घेऊन मी स्वतः बसून एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांनी फॉर्म भरले तर ते किचकट होईल. एका मतदार संघातून एक उमेदवार दिला तर ताकत लावता येईल. आपण त्या मतदार संघात एक फॉर्म ठेऊ आणि बाकीचे काढून घेऊ असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले आहेत की,ज्यांना फॉर्म काढून घ्यायला सांगण्यात येईल त्यांनी फॉर्म काढून घ्यावा, जर एखाद्या मतदारसंघात सांगूनही फॉर्म ठेवला तर त्याने मुद्दाम फॉर्म ठेवला आणि तो मॅनेज झाला, याचा अर्थ असा होईल त्याला मराठ्यांशी काही देणघेण नाही असं मानण्यात येईल. मी आज आणि उद्या कोणते उमेदवार द्यायचे याची यादी करत आहे, पण डीक्लेर करणार नाही. माझी विनंती आहे की येत्या २३ तारखेपर्यंत इच्छुकांच्या शिवाय मला कोणीही भेटायला येऊ नका असं यावेळी जरांगे पाटील हे म्हणाले आहेत.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai