जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती :- बारामती तालुक्यामधील विनयभंगाचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आसून, एका अल्पवयीन मुलीच्या कॉलेजमध्ये जाऊन दोन तरुणांनी ‘मिकी माउस कशी आहेस, तू मला खुप आवडतेस’ असे म्हणून अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केला असल्याचा प्रकार आता समोर आलाय. सदरच्या प्रकरणात दोन तरुणांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आसून. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत,तुषार सुरेश गुलदगड राहणार पळशी, तालुका बारामती तसेच अविनाश नानासो पवार राहणार वाणेवाडी, तालुका बारामती याबाबतची फिर्याद १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने पोलिसांत दिली आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन तरुणी एका कॉलेजच्या इमारतीतून जात असताना अविनाश पवार याने तिला ‘मिकी माउस कशी आहेस, तू मला लय आवडतेस’ असे म्हणून अश्लील हावभाव करून पीडित अल्पवयीन तरुणीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले होते. अविनाश पवार हा सुमारे एक वर्षभरापासून, तसेच सुरेश गुलदगड हा मागील ६ महिन्यांपासून अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून , अश्लील हावभाव करून तसेच अश्लील टोमणे मारून वारंवार तिला त्रास देत होता.
त्यांच्या त्रासास कंटाळून मागच्या २ महिण्यांपासून अल्पवयीन तरुणीने एसटी मधून प्रवास करणे बंद केले होते. या दोन तरुणांच्या त्रासामुळे ती तरुणी महाविद्यालयाच्या एका शिक्षकासोबत त्यांच्या गाडी मधून कॉलेजमध्ये जात होती. दोन्ही तरुणांनी कॉलेजमध्ये जाऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अल्पवयीन तरुणीच्या मानसिक स्थितीवर परिणाम हा झाला होता. त्या अल्पवयीन तरुणीने कॉलेजमध्ये तिच्या सोबत घडत असलेला प्रकार प्राचार्य व शिक्षकांना सांगितल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात त्या दोन तरुणांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदरील घटनेचा अधिकचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह