जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे :- राज्यामधील ३४ जिल्ह्यांतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १९ महिन्यांचे ३३९ कोटी ९१ लाख ३६ हजार ७३६ रुपये अनुदानापैकी ९ महिन्यांचे १६१ कोटी १ लाख १७ हजार ४०१ रुपये अनुदान कर्मचाऱ्यांना वर्ग होणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांसाठी मंजूर १९ महिन्यांच्या १० कोटी ६६ लाख ७२ हजार ८४५ अनुदानापैकी पाच कोटी पाच लाख २९ हजार २४२ अनुदान वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर ९ महिन्यांचे अनुदान मिळणार असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी यामुळे गोड होणार आहे.
संघटनेकडून १९ महिन्यांचा फरक मिळणे अपेक्षित असताना फक्त ९ महिन्यांचा फरक कर्मचाऱ्यांना वर्ग करण्यात येणार आहे. तरी उर्वरित राहिलेल्या १० महिन्यांचे वेतन होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यावर तातडीने वर्ग करावे, नाहीतर राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी धरणे आंदोलन व धडक मोर्चे काढू, असा इशारा श्रमिक संघाच्या राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने संस्थापक ज्ञानोबा घोणे, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड, ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र वाव्हळ, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता लांडगे, उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, अर्जुन रांजणे, विभागीय अध्यक्ष संतोष तुपे, कार्याध्यक्ष श्रीहरी दराडे यांच्या सह्या़ंनी महाराष्ट्र पंचायत राज साखर संकुलाचे गिरीश भालेराव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यातील प्रमुख मागण्यांपैकी किमान वेतनामधील १९ महिन्यांची मंजूर केलेल्या फरकाच्या रकमेपैकी ९ महिन्यांचा फरक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिनांक १८ पासून वाटप करणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्याच्या पंचायतराज राज्य व्यवस्थापनाकडून जिल्हा परिषदांना दिल्याचे श्रमिक संघाचे संस्थापक ज्ञानोबा घोणे यांनी माध्यमांना सांगितले आहे
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत वारंवार मोर्चे आंदोलने केली होती. तरीपण, मागण्या मान्य होत नसल्याकारणाने सातारा आणि पुणे श्रमिक संघाच्या राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने निवडणूक कामकाज व मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत चे पत्र हे प्रशासनाला दिले होते.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
One Response
maheshbhat043@gmail.com