विधानसभा सार्वत्रिक निवडनूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ; मुख्य निवडनूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची पत्रकार परिषद संपन्न.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

 मुंबई :- भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केले.

त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या १६ – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविलेले नाही त्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. असे यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी म्हटले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai