खुनाच्या गुन्हयातील आरोपीला अवघ्या ४ तासात ठोकल्या बेड्या; भिगवण पोलीसांची कामगिरी.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

  इंदापूर:- इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातील मदनवाडी गावच्या हद्दीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, एका ४५ वर्षीय वयाच्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार मंगळवार दिनांक १५ रोजी सकाळी उघडकीस आला आसून. त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून खून करणाऱ्या मित्राला भिगवण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव विजयकुमार विठ्ठलराव काजळे (वय ४५ वर्ष) राहणार.निरगुडे ता. इंदापूर जि.पुणे असे आहे.

भिगवण पोलीस स्टेशनकडील माहितीनुसार, भिगवण पोलीस स्टेशन हद्दीमधील मदनवाडी गावाशेजारच्या वनविभागाच्या माळरानावरती या घटनेतील मृत व्यक्ती विजयकुमार काजळे तसेच त्याचा मित्र राज भगवान शिंदे, (वय २० वर्ष) राहणार मदनवाडी ता. इंदापूर जि. पुणे हे दोघेजण रात्री एकत्र बसले असता. त्यांचा शुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण होऊन आरोपी आसणाऱ्या राज शिंदे याने विजयकुमार काजळे याच्या डोक्यात दगड मारून त्याचा अत्यंत निर्दयीपणे खून केला आहे.

सदरचा मृतदेह पोलीसांनी ॲम्बूलन्स मधून शवविच्छेदनासाठी भिगवण येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला होता. सदरील मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन पार पडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सदरचा मृतदेह देण्यात आला आहे.

भिगवण पोलिसांच्या वतीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अवघ्या चार तासांच्या आतमध्ये गुन्हयातील आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले आहे. भिगवण पोलीसांच्या वतीने सदरच्या इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस करत आहेत.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें