जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई :- राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आला असून त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जखमी अवस्थेत त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतू त्यांचा या दुर्दैवी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सदरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिन जनांना ताब्यात घेतले आहे. हा हल्ला झाला तेव्हा बाबा सिद्दीकी निर्मल नगर भागातील आपल्या कार्यालयातून निघून गाडीत बसले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी लपून त्यांच्यावर गोळीबार केला आहे. पण आता मोठी बातमी म्हणजे बाबा सिद्दिकी हत्येचे पुणे कनेक्शन आता समोर आले आहे. तिन ही आरोपींना पुण्यातून बोलविल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.
66 वर्षीय बाबा सिद्दीकी एक वेळा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार सुद्धा राहिले आहेत. त्यांचा मुलगा झीशान हा वांद्रे पूर्वचा आमदार असून, त्यांनी अद्याप काँग्रेस सोडण्याची घोषणा केलेली नाही. ते मुंबई युवक काँग्रेसचे प्रमुख आहेत. बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते. मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी 1990 च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरू केले. 1992 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा विजयी झाले. बाबा सिद्दीकी 2004 ते 2008 या काळात मंत्रीही राहीले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूने राजकीय विश्वामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.असं असतानही ही हत्या झाल्याने जनतेमधून या गोष्टीचा निषेद व्यक्त होत आहे.वांद्रे पूर्व भागात त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीचं ऑफिस आहे. या ऑफिसबाहेरच तीन ते चार जणांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना दोन ते तीन गोळ्या लागल्या. त्यांना जखमी अवस्थेतच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर. तेथे त्यांना डॉक्टरांकडून तपासून मृत घोषित करण्यात आलं आहे.
हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील गोळीबार करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पाच्या वादामुळे हा हल्ला झाला असावा असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पोलीस अधिकारी या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.
वाय श्रेणी सुरक्षेत एकूण 11 सुरक्षा कर्मचारी असतात. ज्यामध्ये दोन खाजगी सुरक्षा रक्षक देखील असतात. या श्रेणीत एकही कमांडो नसतो.देशातील प्रतिष्ठित आसणाऱ्या व्यक्ती आणि राजकारणी यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना यापैकी एक सुरक्षा दिली जाते.वाय सुरक्षा मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेपेक्षा वेगळी आहे. यामध्ये आधी सरकारला यासाठी अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर सरकार गुप्तचर यंत्रणांमार्फत धोक्याचा अंदाज घेते. धोक्याची खात्री झाल्यावर सुरक्षा ही दिली जाते.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह