इंदापूरातील जागेचा निर्णय शरद पवारांनी मागे घ्यावा नाहीतर,बंडखोरी अटळ;दशरथ माने यांचा सुचक इशारा.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

इंदापूर :-इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात शरद पवारांच्या पक्षातील नेते एकवटल्याचं चित्र इंदापूर मध्ये आजच्या झालेल्या परिवर्तन मिळाव्यामधून दिसून आलं. प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शाह यांच्या उपस्थितीत आज इंदापुरात परिवर्तन मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा नाहीतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बंडखोरी ही इंदापूर मध्ये पहायला मिळेल. असा सुचक इशाराचं यावेळी दशरथ माने यांनी परिवर्तन मेळाव्यातून दिला आहे.

परिवर्तन मेळावा प्रसंगी बोलताना अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, कि आज इंदापुर येथे मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. इंदापूर तालुक्यात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्यांच्यात धमक असते तोच काम करतो आणि पुढ जातो. लोकांसमोर काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. गेल्या आठ दिवसांमध्ये काय घडामोडी घडल्या, की लोकसभा निवडणुकांमध्ये कोणी – कोणी प्रामाणिक काम केले ते कळायला हवं. गेल्या २०-२५ वर्षे राजकारणात जबाबदार व्यक्ती म्हणून मि काम करत आहे.

खुप वेळा माझ्यासारखा भोळ्या भाबड्या कार्यकर्त्याचा बऱ्याचदा बळी पडला आहे. विश्वास दिला, चर्चा झाल्या अनेक लोक साक्षीदार आहेत. यावेळी मदत करा, पुढच्या वेळी मी तुम्हाला मदत करतो असं राजकारण झालं. परंतू गेली २५ ते ३० वर्ष या तालुक्यात काम करताना आमचं कुठे चुकलं? ते सांगा आम्ही कुणाचे पैसे घेतले नाहीत. पदरचे पैसे खर्च करतोय. आज आम्ही अपक्ष उभं राहायचा विचार करतो आहे. या परिवर्तन मेळाव्यातून लोकांसमोर भूमिका घेऊ असं आमचं ठरलं आहे. उद्याच्या निवडणुकीत आपल्याला काय करायचं हे जनतेनं सांगावे असं यावेळी बोलताना मेळाव्यात अप्पासाहेब जगदाळे म्हणाले आहेत.

२०१४ साली अडीच वर्ष अगोदर मला सांगितले, मला लढायला सांगितले. निवडणुकीला अर्ज भरायला ४ बाकी राहिले तेव्हा अप्पासाहेब मलाच उभं राहायचं सांगितले, आमची समजूत काढली, पवार कुटुंबाचं मी ऐकलं. या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. २०१४ साल ची निवडणूक झाली, २०१९ मध्ये पण, मी साहेबांकडे चार वेळा चकरा मारल्या होत्या. मात्र,२०१४ व २०१९ साली देखील नाही, आता आपलं काही खरं नाही असं वाटतंय असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

इंदापूर ची बंडखोरी परवडणारी नाही. इथलं मोहोळ संपूर्ण महाराष्ट्रात उठल्याशिवाय राहणार नाही. हा आवाज जनतेचा आहे. आवाज कोणी सुद्धा दाबू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा आहे. लोक प्रामाणिक पणाला साथ देतात. कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही हे लक्षात घ्याव, शरद पवार यांनी आपला इंदापूरातील निर्णय मागे घ्यावा नाहीतर महाराष्ट्रातील मोठी बंडखोरी इंदापूरात होईल असा इशाराच दशरथ माने यांनी परिवर्तन मेळाव्यातून दिला आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें