जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई , राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गरोदर काळात महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना साडी नेण्यास सरकारने परवानगी दिली आहे.या बाबतचा आदेश सरकारने बुधवारी काढला आहे. दरम्यान, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यानंतर डीजीपी कार्यालया तर्फे संबंधित महिला कर्मचाऱ्याला साडी नेसण्याची परवानगी दिली जाणार आहे.
राज्य सरकारने महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गर्भधारणा दरम्यानच्या काळात आणि प्रसूती नंतर सुद्धा साडी नेसण्याची परवानगी दिली आहे. यासाठी गर्भधारणेचं वैद्यकीय प्रमाणपत्र संबंधित कर्मचाऱ्यांनी सादर करणे आवश्यक राहील. गर्भधारणेचे पहिले काही महीने काळजी घेणे गरजेचे असते. या काळात महिलांनी पोटावर बेल्ट घातल्यास याचे गंभीर असे परिणाम संबंधित महिलेच्या तब्येतीवर किंवा गर्भधारणेवर सुद्धा होऊ शकतात. तसेच गणवेश घालण्यात सुद्धा अडचणी येतात. म्हणून महिला पोलिस कर्मचाऱ्यांची ही अडचण लक्षात राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे समजतं आहे.
गर्भधारणेच्या काळात यापूर्वी गणवेश परिधान करण्यास सूट देण्याचा प्रस्ताव डीजीपी कार्यालयाने पाठविला होता. जो गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडे प्रलंबित होता. या बाबत बुधवार दि.९ रोजी राज्य सरकारने गर्भधारणा काळात गणवेश परिधान करण्याबाबत सूट देणारा शासनाच्या वतीने अंमलबजावणीचा जीआर हा काढण्यात आला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह