वालचंदनगर पोलीसांची दमदार कामगिरी;पळून जाणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

 इंदापूर :- इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असणारा आरोपीला वालचंदनगरच्या पोलीसांनी पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन मुसक्या आवळल्या आहेत.

सविस्तर हकीकत पुढील प्रमाणे आहे,वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी मारामारी व ॲट्रोसिटी अंतर्गत दिपक मारुती माने, (वय 26 वर्ष ) राहणार सणसर या इसमावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासुन तो पोलीसांना गुंगारा देत असल्याने सापडत नव्हता. आज सोमवार दिनांक 7 रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सणसर ग्रामपंचायत कार्यालयाजवळील बाजार तळावर तो बसला असल्याची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने दिपक माने याला पकडण्यासाठी पोलीस पथक पाठवले होते.

यावेळी पोलिस आल्याचे दिसतातच माने हा सणसर येथील ओढ्याच्या पुलावरुन पळून जात असताना त्याने पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शैलेश स्वामी, अजित थोरात, गुलाब पाटील, यांनी त्याचा चित्तथरारक पाठलाग करुन ओढ्यामध्ये उड्या मारुन माने याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर दिपक माने याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आज किंवा उदया न्यायालयामध्ये त्यास हजर करण्यात येणार आहे. असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें