जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
बारामती , उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी बारामती दौऱ्यावर होते. व्यापारी मेळाव्याच्या कार्यक्रमात बारामतीमधील विकासकामांची जंत्री अजित पवार यांनी मांडली. तुमच्याकडे आलेल्या ग्राहकाला मी केलेली बारामतीमधील विकासकामे सांगितली तरी माझे काम सोपे होईल, असे अजित पवार म्हणाले. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी दुसरीकडून कुठूनही न लढता बारामतीमधूनच मी लढेन, असे अप्रत्यक्ष सांगितले. तसेच शिरूरमधून लढणार असल्याचे खंडनही केले.मात्र सोमवारी रात्री बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात बारामतीमधूनच लढणार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत.
तसेच पुढे ते म्हणाले की,पूर्वी पवारांकडून जेवणं मिळत नव्हती. काहीच मिळत नव्हतं. पवार भेटायलाही येत नव्हते. कुठे काय झालं तर मी कधीतरी भेटायचो. आता शहरात लोक फिरायला लागली, घमेली वाटायला लागली. साड्या वाटायला लागली. असं सगळं व्हायला लागलं आहे. त्या निमित्ताने पवार घरी यायला लागले हे बरं झालं ना आता नावं माहित नसलं तरी मी ओळखते तुम्हाला ओळखते तुम्हाला. कधी नव्हे तो अजित पवारही हसायला लागलाय. मिळतयं ते घ्या, सोडू नका पण घड्याळाला मतदान करा.तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील, असं मोठं विधानही अजित पवारांनी यावेळी केलं आहे. पुन्हा मला येता येणार नाही. मला राज्यात फिरावं लागणार आहे. आता तुमची सर्वांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडा, असे निर्देशही अजित पवारांनी यावेळी दिले.
आतापर्यंत बारामतीकरांसाठी मी हजारो कोटींची कामे केली आहेत. त्यामुळेच तुम्ही घडाळ्यासमोरचं बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा. तुमच्या मनातला उमेदवार घड्याळ घेऊन बारामतीत उभा राहील, असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. उपस्थितांनी उमेदवाराचे नाव घोषित करा, असा आग्रह केल्यानंतर लोकांच्या मनात कोण आहे, याबद्दल मला सर्व्हे करावा लागेल, असे हसत हसत अजित पवार म्हणाले. गहाळ राहू नका, जो मोठ्याने माझ्या नावाची घोषणा देतो, त्याचाच बूथ मागे राहतो, असे माझे निरीक्षण आहे, असे चिमटेही त्यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना काढले आहेत.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह