कासपठार फिरायला जाणाऱ्या इंदापूरच्या कामगारांवर काळाचा घाला; अपघातात चार जणांचा मृत्यू,तर तीन जन गंभीर जखमी.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी

माळशिरस:- पुणे- पंढरपूर मार्गावरील कारूंडे ता.माळशिरस गावाजवळील पुलावर झालेल्या कार व टेम्पोच्या भिषण अशा अपघातात चार जणांचा जागेवरचं मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात रविवार सकाळी आठच्या सुमारास घडला आहे.अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , लासूर्णे ता.इंदापूर येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा जवळील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते सर्वजण नातेपुते येथून उलट्या दिशेने निघाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. लासूर्णे इंदापूर येथून फक्त २० किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे ता.माळशिरस येथील पुलावर सकाळच्या ८ वाजताच्या सुमारास सदरच्या टेम्पोने कारला धडक दिल्याने हा भीषण असा अपघात घडला आहे.

यामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेस शंकर घोरपडे (वय २८ वर्ष), कोमल विशाल काळे (वय ३२ वर्ष), शिवराज विशाल काळे (वय १० वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आसून. सदरच्या अपघातात आकाश लोंढे (वय २५ वर्ष), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३० वर्ष), अश्विनी घोरपडे हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें