जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश आज रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरदचंद्र पवार यांच्या बरोबरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बारामती खासदार सुप्रिया सुळे , खासदार अमोल कोल्हे इत्यादी महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी हर्षवर्धन पाटील घराण्यातील सदस्य देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे .राजकीय संकटात सापडल्याने काँग्रेसचा पक्षाचा हात सोडून भाजपवासी झालेले परंतु तिकडेही तशा प्रमाणेच संकाटात सापडल्याने आज अखेर ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद चंद्र पवार यांच्या मुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज सकाळी प्रवेश केला आहे.
त्यांच्या या पक्ष प्रवेशाने पवार घराणे व पाटील घराणे या दोन घराण्यांमधील जवळ पास 35 ते 40 वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. बारामती आणि इंदापूर मध्ये गेली 2 दशकं छुपा संघर्ष होत असायचा. महाविकास आघाडीत असून सुद्धा अजित दादा पवार आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असायचे. परंतु आता भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनीच तुतारी हाती घेतल्याने ज्येष्ठ नेते तसेच अभ्यासू नेता म्हणून पुणे जिल्ह्याचे नेतृत्व आपसुकच त्यांच्याकडे आता येणार आहे.
याची घोषणाचं जणू शरदचंद्र पवार यांनी आपल्या भाषणात केल्याचे दिसून आले आहे.
काही दिवसांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अप्रत्यक्ष सहभाग होता, असे हर्षवर्धन पाटील आपल्या भाषणात म्हणाले आहेत. तसेच सुप्रिया सुळे ह्या आमच्या भगिनी आहेत. आमची बहीण 4 वेळा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामध्ये त्यांना तीन वेळा विजयी करण्यात आमचा प्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. पण या वेळी त्यांना मताधिक्य देण्यात आमचा अप्रत्यक्ष सहभाग होता असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणामधून केला आहे . भाजपमध्ये राहून सुद्धा तसेच महायुतीचा भाग असून सुद्धा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी काम केले नाही, अशी अप्रत्यक्ष कबुलीच पक्षप्रवेशाच्या भाषणादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातामध्ये घेताच दिली आहे.
हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर मध्ये खच्चीकरण करण्याकरिता अजित दादा पवार यांनी अनेकदा इंदापूरच्या स्थानिक नेतृत्वाला बळ दिले होते. दत्तात्रेय मामा भरणे हे आमदार झाले हे केवळ अजित दादा पवार यांच्यामुळेच. हर्षवर्धन पाटील हे राजकीय पटलावरून दूर व्हावेत, यासाठी त्यांचा तालुक्यामध्ये पराभव करण्याकरिता अजित दादा पवार यांनी दत्तात्रय मामा भरणे यांना वेळोवेळी आपली राजकीय शक्ती दिली होती . त्यामुळेच 2014 व 2019 सालच्या विधानसभा निवडनूकांमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.
हर्षवर्धन पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांच्याकडे राज्यातील महत्वपुर्ण नेते म्हणून पाहिले जायचे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री कोणीसुद्धा असुदयात हर्षवर्धन पाटील हे त्या मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळ असायचे. आघाडी सरकारमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कॅबिनेट मध्ये महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील असायची. तसेच त्याच सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार यांच्या कडे सुद्धा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असायच्या. परंतु काही ना काही कारणांवरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष होत असायचा. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये अनेक कारणांवरून मतभेद व्हायचे. पुणे जिल्ह्यामधील इंदापूर आणि बारामती हे शेजारी – शेजारी असणारे तालुके आहेत. त्यामुळेच पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करण्यावरून अजित दादा पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात तीव्र स्पर्धा व्हायची.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह