पुण्याच्या बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज पोलीसांच्या हाती;पोलीसांकडून २५ पथकं तैनात.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी

पुणे,पुण्यातील बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर तिन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचं आता समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात अद्याप एकाही आरोपीला पोलीसांकडून अटक करण्यात आली नाही.पोलीसांनी दोन आरोपींचे स्केच जारी केले आहेत. सदर प्रकरणात एक महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचे दिसत आहे.

सीसीटीव्ही मध्ये तीन ही संशयीत नराधम आरोपी दिसत असून. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तीन संशयीत व्यक्ती एका दुकानाबाहेर बाईक जवळ थांबले आहेत. ४ ऑक्टोबरच्या दुपारी १.३६ वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. सदरची घटना घडण्यापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. सदरच्या तिन्ही नराधम ओरोपीं ची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीसांनी त्यांना शोधण्यासाठी २५ पथकं तयार केली आहेत. तसेच पोलीस सदरच्या घटनेच्या मुळाशी गेल्या शिवाय राहणार नाहीत.

त्या रात्रीत नेमके काय घडलं होते?

पोलिसांकडील मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी आपल्या मित्राबरोबर बोपदेव घाटावर फिरण्यासाठी गेली असता. त्यादरम्यान ३ संशयित व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांनी पिडीत तरुणीच्या मित्राला त्याच्याच कपड्यांनी बांधले होते. त्यानंतर त्याला मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर आळीपाळीने तिन्ही आरोपींनी सदरच्या पिडीत तरुणीवर बलात्कार केला.

पोलिसांकडील माहितीनुसार, ३ ही आरोपींकडे कोयता व बांबूच्या काट्या होत्या. त्यांनी या घटने दरम्यान पिडित मुलीचे सर्व दागिने काढून घेतल्यानंतर तिच्यावरती बलात्कार केला. त्यानंतर कोणाला याबाबत काही सांगितले तर याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी त्यांनी पिडित तरूणी व युवकाला दिली. त्यानंतर ते त्या घटनास्थळावरून त्यांनी पोबारा केला.

सदरील आरोपी घटनास्थळ सोडून गेल्यानंतर तरुणीने प्रथम आपल्या बांधलेल्या मित्राला सोडवल्या नंतर दोघे ही पिडीत तरुणीच्या घरी गेले. सदरील पिडित तरुणी आपल्या बहिणीसोबत राहत होती. त्यानंतर ते कोथरुड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. तेथील हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते दोघेही ससून हॉस्पिटलला गेले त्यानंतर ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी घटनेची माहिती पहाटे ५ वाजताच्या दरम्यान पोलिसांना दिली.

पोलिसांनी याप्रकरणात पीडित मुलीच्या मित्राच्या वर्णनावरून  २ नराधम आरोपींचे स्केच जारी केले आहेत. सदरच्या ३ आरोपींची माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai