जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
इंदापूर, काही दिवसांपूर्वी इंदापूर मधील कॉलेजच्या प्रवेशव्दारासमोर एका युवकावरती गोळीबार झाला होता त्यामध्ये तो युवक गंभीर जखमी झाला होता, जखमी असणाऱ्या युवकाला इंदापूर व अकलूज येथील हॉस्पीटल मधून पुण्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारांसाठी नेण्यात आले होते परंतु आज दि. ४ रोजी युवकाची मृत्यूबरोबर असणारी झुंज अयशस्वी ठरल्याने त्याची प्राणज्योत ही मालवली आहे, सदरील तरुणाचे नाव राहुल अशोक चव्हाण असून तो राहणार शिरतोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील असून त्याच्या शवाचं शवविच्छेदन ससून हॉस्पिटल पुणे येथे झाल्यानंतर त्याच्या मुळ गावी नेऊन त्याच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत गावातील तनावपूर्ण वातावरणामुळे गावामध्ये कडक असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सविस्तर हकीकत पुढील प्रमाणे , पोलिसांमध्ये केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणांमुळे सोमवार दि.३० सष्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर राहुल चव्हाण या युवकावर गोळीबार करण्यात आला होता तसेच त्याच्यावर इंदापूर व अकलूज येथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते त्याची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.
या गोळीबार प्रकरणातील आरोपी असणाऱ्या अभिजीत चोरमले , क्षितिज चोरमले ,प्रकाश शिंदे , धीरज उर्फ सोन्या चोरमले या चार आरोपींना इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यातील फरार असणारे अशोक चोरमले , विश्वजीत चोरमले , महेश शिंदे , ओम ठवरे व सोमनाथ ठवरे सर्व राहणार शिरतोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांचा शोध इंदापूर पोलिसांच्या वतीने चालू आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 270