पश्चिम महाराष्ट्रात अजून एक राजकीय भूकंपाचा धक्का ; शरदचंद्र पवार पक्षाकडून महायुतीला बसणार.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

इंदापूर तालुक्याचे भाजपा चे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजप पक्षाची साथ सोडत शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे कालच्या झालेल्या इंदापूर येथील पत्रकार परिषदेत घोषित केले आहे तसेच त्यांच्या प्रवेशाची तारीख सुद्धा निश्चित झाल्याचे समजतं आहे येणाऱ्या ७ ऑक्टोंबर रोजी इंदापूर येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे ,त्यामुळे हा सर्वात मोठा धक्का भाजप पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्र्वभूमीवर शरदचंद्र पवारांनी लगावल्याचे दिसून येत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात अजून एक राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आसल्याचे समजंत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील महायुती मधील एका घटक पक्षाचा सामर्थ्यवान नेता लवकरच शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे समजते आहे.लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात रान उठवणारे अजित दादा पवार गटातील ज्येष्ठ नेते तसेच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर हे लवकरच आपल्या कार्यकर्त्यांसह शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.

फलटण येथील खटके वस्तीवरती रामराजे निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज रात्री बोलावला असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजतं आहे तसेच ते आपल्या कार्यकर्त्यांशी बातचीत करून पुढील निर्णय घेणार असल्याचे समजते आहे तसेच त्यांनी घड्याळाचे साथ सोडून तुतारी हाती घेण्याचे ठरवलं असल्याचे सुत्रांकडून समजतं आहे, रामराजे निंबाळकर यांचे सोबत विद्यमान आमदार असणारे दीपक चव्हाण हे देखील पक्ष प्रवेश करतील असे समजते आहे.

अजित दादा पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे की , रामराजे निंबाळकर हे आमचे जेष्ठ नेते आहेत तसेच ते कोठे सुद्धा जाणार नाहीत तसेच ते पुढे म्हणाले की महायुतीचे नेते जरूर दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत परंतु शरदचंद्र पवार गटात कोणतीही मोठी भरती होणार नाही तसेच रामराजे निंबाळकर हे आमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत ते कोणतेही चुकीचे पाऊल उचलणार नाहीत. तसेच ते आमचा पक्षातचं राहतील.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें