जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
सदरची घटना सातारा जिल्हयातील आहे,घटनेची हकीकत पुढील प्रमाणे आहे शेतामध्ये गेलेल्या ५ वर्षाच्या लहान बालकावर तरसाने केलेल्या हल्ल्यानंतर बालकाच्या वडीलांनी तरसा बरोबर लढा देत मुलाचे प्राण वाचविले आहेत.मात्र तरसाच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला आसून , त्याच्या चेहऱ्यावर तसेच डोक्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.वडिलांनी आपल्या मुलासाठी तरसाशी दिलेल्या झुंजीचे परिसरामध्ये कौतुक होत आहे. सदरची घटना पिंपरी तालुका कोरेगाव येथे बाळूबाचा डोंगर परिसरातील तरस खोरे नावाच्या शिवारात संतोष मदने हे इसम शेळ्या चारण्यासाठी गेले होते. मुलानी त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट धरल्यामुळे त्यांनी आपल्या ५ वर्षाचा संकेत यास आपल्या बरोबर शेतामध्ये जाण्यासाठी बरोबर घेतले होते.
शनिवार दि.28 रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास वडलांपासून सुमारे पंधरा ते वीस फूटाच्या अंतरावर संकेत हा खेळत आसताना , वडिलांचे लक्ष हे शेळ्या चारण्यात मग्न असताना अचानकपणे आपल्या मुलाच्या ओरडण्याचा आवाज त्यांना ऐकू आल्याने. त्यांनी पाठीमागे वळून पाहिले असता तरसाने मुलाचे डोके तोंडात धरल्याचे त्यांना दिसून आल्यानंतर, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तरसावरती झडप घालून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतू अचानकपणे हल्ला झाल्याने तरसाने मुलाचे डोके सोडून संतोष मदने यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.
परंतू संतोष मदने यांनी आपल्या लेकरासाठी निकराचा लढा देऊन तरसाला तेथून हाकलून लावले होते. तसेच तरसाने संकेत मदने याचे डोके जबड्यात धरल्याने त्याच्या गाल तसेच डोक्यात दाताच्या गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्याचे डोके पुर्णपणे रक्ताने माखले होते. सदरच्या घटनेची माहिती ही संतोष मदने यांनी कुटुंबीयांसह आपल्या मित्रांना दिल्यानंतर. त्यांनी जखमी असणाऱ्या संकेत मदने याला रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये पुढील उपचारासाठी नेहण्यात आले तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम मदने यांनी जखमी संकेत याची तपासणी करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर. पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथील शासनाच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याची सूचना केली. सध्या त्याची प्रकृती ही स्थिर आसून या घटनेची वन विभागाने दखल घेणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. तसेच वनविभागाने याचा बंदोबस्त करावा असा सुर आता समस्त शेतकरी वर्गातून उमटू लागल्याचे दिसू लागले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह