जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
पुणे,पुणे जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधी वितरणात महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित धरणे आंदोलनात राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती खासदार सुप्रिया सुळे, कॉग्रेस पक्ष भोरचे आमदार संग्राम थोपटे, कॉग्रेस पक्ष सासवडचे आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार व इतर पदाधिकारी यावेळी या आंदोलनामध्ये आज सहभागी झाले होते. यावेळी लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना पुढील प्रमाणे बोलून दाखवल्या आहेत, आम्ही जनतेतून निवडून आलो आहोत, तरीही आम्हाला निधी का दिला जात नाही असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रूपये खर्च करते, पण आम्ही जनतेच्या मागणीनुसार आम्ही सुचविलेल्या काही लाखांच्या विकासकामांसाठी निधी देण्यास नकार दिला जातो, हे सांगताना सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. केंद्रिय मंत्री मा. नितिन गडकरी विकासकामांसाठी भरघोस निधी देतात, परंतू त्यांच्या विचारांचे आसणारे राज्यातील सरकार मात्र निधी देत नाही, हे मोठे दुर्देव आहे, असे सांगून जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडी लढा देत राहिल, असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना जिल्हा नियोजन समितीत महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना विकासकामांसाठी निधी मिळावा, या मागण्याचे पत्र यावेळी दिले. याप्रसंगी आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक बापू पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 125