जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
बारामती एमआयडीसी ते बिल्ट ग्राफिक्स कंपनी जवळ पुणे सोलापूर हायवेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणासाठी मानला जाणारा मार्ग म्हणून गेली 15 ते 20 वर्षे झाले परिसरातील नागरिकांकडून सदरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी ही सातत्याने होताना दिसत आहे,त्याला कारण ठरलं आहे ते म्हणजे बारामती एमआयडीसी- रुई- सावळ- म्हसोबाचीवाडी- निरगुडे – आकोले हा मार्ग इंदापूर एमआयडीसीला जोडणारा अत्यंत जवळचा महत्वाचा दळणवळणाचा मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख आहे, परंतू तो रस्ता खुपच अरुंद आहे त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावर तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच तो जवळचा मार्ग असल्याने त्या मार्गाचा वापर हा मोठया प्रमाणात वाढला आहे तसेच वाहनधारकांना बारामती एमआयडीसी येथून भिगवणला जाऊन पुणे सोलापूर हायवेला जाऊन मगच इंदापूर, सोलापूर,व इतर पुर्वेकडच्या भागात जाण्यासाठी सदरच्या रस्त्याचा वापर हा पर्यायाने करावा लागत आहे.
तसेच ते अंतर ही जवळपास ७ किलो मीटरने जास्त असल्यामुळे वाहनधारक हे जवळील पर्यायी मार्गाचा वापर करत आहे, त्यामुळे बारामती एमआयडीसी ते रुई-सावळ – म्हसोबाचीवाडी -निरगुडे- आकोले , (असा मार्ग ) ग्राफिक्स कंपनी जवळ सोलापूर हायवेला जोडणारा रस्ता हा खूपच अरुंद असल्याकारणाने सदरच्या रस्त्यांवरती छोटे- छोटे अपघात हे दररोज घडत असतात तसेच बारामती येथील एमआयडीसी व कॉलेजला इंदापूर तालुक्यातील अकोले, निरगुडे , म्हसोबाचीवाडी व बारामती तालुक्यातील सावळ या गावांमधील कामगारवर्ग व विद्यार्थी हे पर्यायी मार्ग म्हणून सदरच्या रस्त्याने दररोज आपापल्या सोयीनुसार प्रवास करत असतात, त्यामुळे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे तसेच बारामती तालुक्याचे विद्यमान आमदार तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बारामती लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे हे लोक प्रतिनिधी सदरच्या रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नांबाबत लक्ष घालणार आहेत का नाहीत, का? फक्त या भागातील नागरिकांचा वापर हा मतांपुरताचं तर केला जात नाही ना? असा प्रश्न आता येथील नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे, तसेच जनतेचे लोकप्रतिनिधी या नात्याने या प्रश्नांची सोडवणूक व्हावी एवढीच माफक अपेक्षा आता येथील नागरिकांकडून बोलताना व्यक्त होत आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 315