सुपा जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
बारामती तालुका पोलीस स्टेशन अंकीत सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सदरील घटना आहे, सुपा पोलीस गस्त पथकाने रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या तीन आरोपींना जेरबंद केले आहे. सदरील आरोपींकडून पोलिसांनी 107 वर्षाच्या चोरीला गेलेल्या मुर्तीसोबत इतर मंदिरातील देवांचे मुखूट आणि मंदिरातील अन्य प्रकारच्या वस्तु त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत,सुपे पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या हद्दीतून त्यांना ताब्यात घेतले आहे.ओंकार शशिकांत सांळुखे राहणार आनंदपुर तालुका वाई जिल्हा सातारा सध्या राहणार शिरवळ पंढरपुर फाटा तालुका खंडाळा जिल्हा सातारा, तुषार अनिल पवार राहणार दत्तनगर सांगवी रोड तालुका खंडाळा जिल्हा सातारा आणि सौरभ दत्तात्रय पाटणे राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा अशी त्यांची नावे असून त्यांच्या बरोबर एक विधीसंघर्ष बालकही होता.पोलिसांनी आरोपींकडून 15 लहान मोठ्या घंटा,1 पानेश्वर देवाची मुर्ती, 2 मुकुट, 2 समई,1 पंचार्थी, अशा प्रकारचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला असून सदरील आरोपींवर पुणे जिल्ह्यामधील हडपसर सुपा,भोर, वेल्हा तसेच सातारा जिल्ह्यातील वाठार पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह सातारा जिल्ह्यातील भागातील मंदिरात चोरीच्या घटना घडलेल्या होत्या. यामुळे जनतेच्या भावनेचा व श्रध्देचा विषय असल्या कारणाने सदरचे आरोपी हे अटक करणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले होते.
सुपा पोलीस स्टेशनचे गस्तपथक दि.16 सप्टेंबर रोजी रात्रीचे गस्त करत असताना त्यावेळी पोलीस काँस्टेबल सचिन दरेकर व सागर आशोक वाघमोडे यांना मौजे दंडवाडी गावचे हद्दीमध्ये एक मारूती सुझुकी कंपनीची अल्टो 800 कार नंबर एम.एच.12 सी.डी. 6757 ही रोडच्या कडेला नंबरप्लेट वर चिखल लावून संशयित रित्या थांबलेली गाडी पोलीसांना दिसून आली त्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने ते त्या गाडीजवळ जाताच कारमधील चालकाने गाडी वेगात पळवून सुप्याच्या बाजूकडे घेवुन गेला त्याच वेळी शेजारीच असलेल्या विठ्ठल मंदिरातील दोन अनोळखी गुन्हेगार त्या ठिकाणाहून अंधारात पळून गेल्यानंतर सदरील घटनेची माहिती संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्र गस्त पथकासाठी तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना दिल्यानंतर पोलिसांनी कार घेवुन पळालेल्या गुन्हेगारांचा पाठलाग करुन त्यांना सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या हद्दीत ताब्यात घेतले आहे. सदरच्या अट्टल गुन्हेगारांनी वाई,राजगड,लोणंद, सातारा,जेजुरी व इतर ठिकाणी सदर प्रकारचे गुन्हे केल्याबाबत पोलीस चौकशीमध्ये सांगितले असल्याने तेथील गुन्हे सुद्धा उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे
पुणे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, बारामती अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, तसेच बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस सब इन्स्पेक्टर जीनेश कोळी, सहाय्यक फौजदार कारंडे, पो.हवालदार रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, अनिल दनाणे,अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, विनोद पवार, पो.कॉ.सचिन दरेकर,सागर वाघमोडे,संतोष जाविर,तुषार जैनक,महादेव साळुंके, किसन ताडगे, ऋषिकेश विर, शिवतारे यांनी वरील कामगिरी केली आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 296