साखर आयुक्त कार्यालयात; शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शेतकरी संघटनेची; साखर आयुक्तांबरोबरच्या बैठकीत सकारात्मक चर्चा…!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी


पुणे,केंद्र सरकारकडून साखर अध्यादेशामध्ये धोरणात्मक बदल करण्याच्या निर्णयामध्ये साखर कारखानदार यांचेबरोबर शेतकरी हा तितकाच महत्वाचा घटक असल्याने शेतक-यांच्यी बाजू या दुरूस्तीमध्ये स्पष्टपणे घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केल्यानंतर आज साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली साखर आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली.

केंद्र सरकारने साखर अध्यादेशामघ्ये अनेक सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्याने त्यामधील अनेक निर्णय हे शेतक-यांच्यासाठी स्वागतार्ह आहेत. यामुळे देशातील व राज्यातील साखर कारखानदार एकवटून यामध्ये दुरूस्ती बदलण्याचा घाट घातला आहे. साखर कारखान्यात तयार होणारे उपपदार्थांचा फायदा -तोटा , व्याजाचा भुर्दंड , कर्जाचा हप्ता साखर कारखान्याच्या ताळेबंदात दाखविला जातो मग उपपदार्थातील उत्पन्न शेतक-यांना का नको ? असा सवाल संघटनेच्यावतीने उपस्थीत केला गेला.
साखर कारखानदारी सुरू होण्याआधी गुळ व खांडसरी उद्योग कार्यरत आहेत. साखर नियंत्रण कायद्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचे मापदंड ठरलेले असून साखरेची व्याख्या एफएसएसआय व बीआयएस मानंकांच्या मापदंडानुसार न केल्यास याचा गुळ व खांडसरी प्रकल्प धारकांना याचा फटका बसणार आहे. याऊलट केंद्र सरकारने पारंपारिक असलेल्या गुळ उद्योगाला चालना देण्याची आवश्यकता असून गुळ पावडर व खांडसरी प्रकल्पातील उपपदार्थांना क्लस्टर मधून अनुदान दिल्यास शेतकरी व कृषी उद्योगातील रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
आजपर्यंत सरकारने जे कायदे केले त्यापैकी साखर कारखानदार स्वत:च्या हिताच्या कायद्याची अमलबजावणी करतात मात्र शेतक-यांच्या बाजूचे हित असल्यास संघटित होवून कायदा पायदळी तुडवीत असल्याचे आजपर्यंत अनेकदा निदर्शनास आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नवीन अध्यादेशामध्ये विविध सुचना सुचविण्यात आले असून या बैठकीत राज्य साखर संघाचे मा. अध्यक्ष पृथ्वीराज जाचक , धैर्यशील कदम , अभिजीत नाईक , स्वाभिमानीचे जनार्दन पाटील , मारोतराव कवळे गुरूजी नांदेड, प्रभाकर बांगर यांचेसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool