एनपी इन्फ्रा कंपनीच्या अवैदय उत्खनन विरुद्ध कारवाई न झाल्यास; संजय शिंदे यांचा,अमरण उपोषणाचा इशारा; इंदापूर येथील घटना…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इंदापूर प्रतिनिधी:- बापू बोराटे

इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील पाझर तलावातील मुरुम उत्खनन् करण्याची परवानगी एन.पी.इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि.यांनी घेतली असून मा.अजय मोरे साहेब अप्पर जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या शासकीय अटींचे उल्लंघन त्यांनी केले असून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. या मागणीचे निवेदन शेटफळ हवेली येथील सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी इंदापूरचे तहसील कार्यालयात दिले होते, परंतु सदर निवेदना वरती महसूल खात्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे संजय शिंदे यांनी २० सप्टेंबर पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यांनी जे इंदापूर तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे, त्यामध्ये त्यांनी खालील तक्रारी व त्या तक्रारी वरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.

सदरील घटना पुढील प्रमाणे, शेटफळ हवेली तलावातून ५० हजार ब्रास मुरुम ऊचलण्यास परवानगी सदर कंपनीने दि. २१/५/२०२४ रोजी घेतली होती. परंतु सदर कंपनीने त्यापेक्षा कितीतरी पटीने अवैधरित्या मुरूम उत्खनन केलेले आहे.याची चौकशी करून कारवाई करण्यात आली पाहिजे. तसेच सदर कंपनीला सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच मुरुम उचलण्यासाठी परवानगी असताना सदर कंपनीने रात्रंदिवस नियमबाह्य मुरूम उत्खनन केलेले आहे.याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच
संबंधित कार्यान्वीत यंत्रणा व क्षेत्रीय महसूल कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत सदर जागेची मोजणी करुन सिमांकन केलेल्या क्षेत्रामध्येच कंत्राटदारांनी उत्खनन् करणे बंधनकारक असताना, सदर कंपनीने शेटफळ तलावामध्ये कोठेही सो मर्जीने नियमबाह्य मुरूम उत्खनन केलेले आहे.आहे.याची महसूल विभागाच्या मार्फत चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच उत्खनन् करून ज्या रस्त्याने वाहतूक केली त्या रोडची दुरुस्ती करणे हे सदर कंपनीस बंधनकारक असताना, कंपनीने सदर रोडची पूर्ण वाट लावून,सदर रोड हा डांबरी असून या रोडवरती पडलेले खड्डे हे डांबर टाकून न बुजवता मुरूम टाकून बुजवलेले आहेत.यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
खालील वाहनाव्दारे कंपनीने दि.३/९/२०२४ रोजी रात्री सुमारे १२.०० वा. पर्यंत नियमबाह्य उत्खनन्न करुन वाहतूक केली. याचे सर्व व्हिडिओ फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहेत असे शिंदे यांनी म्हटले आहे.एम एच १२ टी व्ही ८६६२(हायवा),एम एच १२ टी व्ही ८६४१ (हायवा),एम एच १२ यु एम ८८५४(हायवा),एम एच १२ टी व्ही ८६४२(हायवा),एम एच १२ एस एक्स १३६९(हायवा),व दोन पोकलेन मशिन बिगर नंबर चे ही सर्व वाहने जप्त करून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात यावी. सदर कंपनीचे मॅनेजर यांनी तालुक्यातील खाजगी वाहने कंपनीच्या नावाखाली चालवून तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुरूम विक्री केली आहे. या मॅनेजर वरती गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.
तसे सदर ठिकाणी आम्ही रात्री ८ वाजता गेल्यावर तिथे हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. असता तिथे असणाऱ्या गाड्यांना जीपीएस आहे का असे विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत.सदर ठिकाणचे व्हिडीओ, फोटो काढण्यात आले. व नंतर गावातील युवकांनी संबंधित तहसिलदार यांना या घटनेची फोनवर माहिती सुद्धा दिली आहे. तसेच तलाठी व सर्कल यांनाही या घटनेची फोनवर माहिती दिली व ११२ या आपत्कालीन नंबरवर कॉल करुन इंदापूर पोलिस स्टेशनला सुद्धा या घटनेची माहिती दिली होती. परंतु वरील सर्व अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न करता कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे तसे असेल तर सर्व महसूल व संबंधित अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिंदे यांनी माध्यमांसमोर केली आहे.
संबंधित कंपनी व तिच्या कमिशन कमविणा-या मॅनेजर यांचेवर तसेच या कामांमध्ये वापरण्यात आलेली सर्व वाहने जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी व सदर कंपनीचा परवाना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावा व शासकीय बुडविलेला महसूल शासनाने वसूल करावा. असे त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे.

एनपी इन्फ्रा कंपनीच्या उत्खनन विरोधात; संजय शिंदे व इतर सहकारी यांचं तहसील कार्यालयाला निवेदन सादर…!!


 

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai