जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, बुधवार दि.18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता पत्रकार भवन नवीपेठ, पुणे येथे पत्रकार परिषद पार पडली आहे, यामध्ये श्री विश्वास पाटील यांनी हैदराबादच्या निजामाचा दप्तरखाना व भारत भरातील पुणे, दिल्ली, विजयवाडा, हैदराबाद, मुंबई, नागपूर व कोलकत्ता येथील दप्तरखान्यांना व ग्रंथालयांना अनेकदा भेटी देऊन उपलब्ध सर्व रेकॉर्ड तपासून मांडलेले विचार व वस्तुस्थिती.. विश्वास पाटील यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे ती पुढील प्रमाणे आहे.
मराठ्यांना हैद्राबाद गॅजेट लागू करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करणार तसेच
प्रथमच सर्वांच्या समोर निजामाचे गॅजेट आनले आहे.
हैद्राबाद गॅझेटनुसार मराठा कुणब्यांसह सर्व जातींचे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड,आणि बिदर नळदुर्ग(धाराशिव) या जिल्ह्यांच्या सलग ४५ वर्ष असलेल्या नोंदींचे वास्तव चित्र झालेल्या पत्रकार परिषेदेमध्ये जेष्ठ लेखक तसेच अभ्यासक विश्वास पाटील यांनी सर्वासमोर पत्रकार परिषेदमध्ये मांडली आहे.
हैद्राबाद, दिल्ली, मुंबईसह अनेक दप्तरखाण्याला भेटी देऊन मी आज पुणे येथील पत्रकार परिषदेत मांडलेले वास्तव चित्र. त्यानुसार निजामाच्या अंकित असलेल्या तत्कालीन मराठवाड्यातील नोंदीचे चित्र खालीलप्रमाणे आहे.
हैद्राबाद निजाम डॉमिनियन
निजाम प्रशासनातले नऊ जिल्हे 1884
हैद्राबाद- अथरफ ई बाल्डा औरंगाबाद,
एलगंदळ बीड रायचूर,
नळगोंडा नांदेड लिंगसागर
वारंगळ परभणी
बिदर गुलबरगा
इंदुर नलदुर्ग (उस्मानाबाद)
मेहबूबनगर, मेढक, शिरपूर तंदूर ,
ह्या जनगणनेसाठी ब्रिटिशांच तगडं नियोजन , शेकडो enumerator म्हणजेच पर्यवेक्षकांची फौज तयार ठेवली होती .
हैदराबादचा बिर्टीश रेसिडेंट सर रिचर्ड मिड Sir Richard Meade यांनी प्रमुख काम पाहिले .
त्याच्या आधी Dr. Brabley & Company नावाच्या जगप्रसिद्ध कंपनीने सुद्धा प्रचंड डाटा कलेक्शन केलं होतं.
1884च्या जुलै महिन्यामध्ये मुंबईहून टाइम्स ऑफ इंडिया प्रेसमधून या बाबतचे औरंगाबाद जिल्ह्याचे म्हणजेच आताच्या औरंगबाद आणि जालना जिल्ह्याचे 877 पानांचे गॅझेटियर प्रसिद्ध केले गेले.
शिवाय पुढे संपूर्ण हैदराबाद निजाम प्रशासन बाबत स्वतंत्र असे आणखी काही गॅझेटियर्स 1901 नंतर प्रकाशित करण्यात आली.
1884 च्या जनगणनेनुसार हैद्राबादची निझाम स्टेटची स्थिति खालीलप्रमाणे-
यामध्ये हैद्राबाद, तेलंगणा आणि मराठवाडा ह्या तिन्ही विभागांची लोकसंख्या एकत्रित आहे.
एकूण लोकसंख्या 98 लाख 45 हजार 594 . हि लोकसंख्या हंटर कमिशनने सुद्धा ग्राह्य मानलेली आहे.
ब्राह्मण– 2 लाख 59 हजार 147 राजपूत -49 हजार 843 बैरागी – 5 हजार 57
बेरड –1 लाख 19 हजार 161 भोई—92 हजार 170 चांभार –4 लाख 47 हजार 312 दर्जी( शिंपी ) 30,937 धनगर 4 लाख 82 हजार 35 गवंडी 30,039
गवळी 2 लाख 12 हजार 608 गोसावी 21395 जोगी 4371 लोहार 56,128 गुजराती 3544 लिंगायत 97 हजार 836 माळी –83 हजार 806
कामाठी 1लाख 94 हजार 284 कोंष्टी 79,142
कोळी –2 लाख 13 हजार 966
कुणबी—-16 लाख 58 हजार 665 .
मराठा –3 लाख 69 हजार 636 ,
मांग -3 लाख 15 हजार 732
महार – 8 लाख 6 हजर 653
मानभाव 2627
कुंभार –90, 835
महाली –1 लाख 2213 ,
मारवाडी—42009,
सोनार 88 हजार 769 ,
तेलंगे –3 लाख 27338 ,
तेली 67,564 ,
वडार 54 हजार 833
बंजारा – 6120 ,
बनिए 3 लाख 92184 भिल्ल –8470 , गोंड 39513 ,कोय्या 45300’ लमाणी—85204, पारधी – 2114
ही सर्व हैद्राबाद डॉमिनियन मधली सन १९८४ मधील प्रत्यक्ष जनगणनेने दिलेली माहिती आहे.
नांदेड जिल्हा
जननेनुसार वर्ष एकूण लोकसंख्या
1881 – 636023
1891- 632522
1901 – 503684
मराठवाड्यामध्ये 1889 मध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यामुळे लाखांहून अधिक माणसे #मृत्यू पावली किवां दुसऱ्या भागामध्ये स्तलांतरित झाल्यामुळे ही मोठी घट पडली.
त्यावेळेच्या नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांची नावे –
उस्माननगर, हदगाव, भैसा, बिलोली, देगलूर, कंधार, नांदेड व उरलेली जहागिरी अंकित भाग
जिल्ह्यातील प्रमुख जातींची एकूण संख्या
मराठा कुणबी किवां कापू – 1,29,700
कोळी- 15,500
व्यावसायिक जाती 48,600 वाणी -34,900
कोमटी- 11,600 धनगर – 45,000 महार – 36,700 मांग व चांभार – 33,000 ब्राह्मण – 10,200
मराठा कुणबी किवां कापू याबद्दल ब्रिटिशांचा पान क्रमांक 226 वरील स्पष्ट रिमार्क
The purely agricultural castes number 1,71,600 or about 34 %, the most important among them being Maratha Kunbi or Kapus 1,29,700
बीड जिल्हा
जननेनुसार वर्ष एकूण लोकसंख्या
1881- 5,58,345
1891- 6,42,722
1901- 4,92,258
1899 व 1900 सालामध्ये बीड भागात पडलेल्या प्रचंड दुष्काळामुळे साधारण दिड लाख लोक मरण पावले किवां त्यापैकी अनेकजण इतर प्रांतामध्ये स्तलांतरित झाले.
1901 मधील बीड जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे तालुके होते.
1 बीड, 2 गेवराई 3 माजलगाव 4 आंबा(मोमिनाबाद) 5 केज 6 आष्टी 7 पाटोदा 8 #जहागिरी अंकित गावे
1905 मध्ये आंबा तालुका केज तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आला व तालुक्याचे नाव केज असे ठेवण्यात आले.
जिल्ह्यातील जातवार #लोकसंख्या अशी
मराठा कुणबी 1,96,000 म्हणजेच जिल्ह्याच्या 39 % कुणबी होते.
बंजारा 36,400 कोळी 2600 महार- 41,300
धनगर- 26,000 मांग आणि चांभार 25,400
ब्राह्मण- 21,600 माळी 12,700 ,
वाणी 6,960 मारवाडी 6,100 ख्रिश्चन- 75
पान क्रमांक 234 वरील महत्वाचा रिमार्क
The most numerous caste is the Maratha Kunabi numbering 196,000, or more than 39 % of the total population.
नळदुर्ग उर्फ उस्मानाबाद (सध्याच्या लातूर मधील काही तालुक्यांसाह)
जननेनुसार वर्ष एकूण लोकसंख्या
1881 – 5,83,402
1891 – 6,49,272
1901 – 5,35,027
1901 च्या प्रशासकीय व्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके खालील प्रमाणे होते.
उस्मानाबाद, कळंब, वाशी, औसा, तुळजापूर, नळदुर्ग , परांडा ,जहागीर अंकित गावे
1905 मध्ये वाशी तालुका कळंब तालुक्यामध्ये तर नळदुर्ग तुळजापूरमध्ये समाविष्ट करण्यात आला.
जिल्ह्यातील मुख्य #जातींची नोंद खालीलप्रमाणे
जाला तेलगू मध्ये कापू व मराठी मध्ये कुणबी म्हणतात त्यांची एकूण लोकसंख्या 2,5000 म्हणजेच जिल्ह्याच्या 38 % होती.
धनगर 28,700 महार 51,000
मांग व चांभार 36,000, वाणी 42,000,
ब्राह्मण – 18,000
तेथे पान क्रमांक 262 वर असे नमूद केले आहे की,
The most numerous castes is that of the cultivating Kapus (Telugu) or Kunbis (Maratha) who number 2,05,000 or 38 % of the total.
परभणी
जणगनेनुसार वर्ष एकूण लोकसंख्या
1881 – 6,85,099
1891 – 8,05,335
1901 – 6,45,765
1901 च्या प्रशासकीय व्यवस्थेनुसार परभणी जिल्ह्यातील तालुके खालील प्रमाणे होते.
परभणी, जिंतूर, हिंगोली, कळमनुरी, बसमत, पालम, पाथरी, जहागिरी अंकित गावे
जिल्ह्यातील प्रमुख जातींची लोकसंख्या खालीलप्रमाणे
कुणबी- 2,60,800, जिल्ह्याच्या 40 % टक्के
महार- 67,400 धनगर- 47,900
बानीया वाणी – 33,700 ब्राह्मण – 20,500
मांग व चांभार-24,000
पान क्रमांक 216 वर अशी नोंद कारण्यात अली आहे की
The most numerous caste is that of the cultivating Kubi who number 2,60,800 or more than 40% of the total population.
औरंगाबाद (आत्ताच्या जालन्यासह)
जननेनुसार वर्ष एकूण लोकसंख्या
1881 – 7,30,380
1891 – 8,28,975
1901 – 7,26,407
1899 व 1900 मध्ये प्रचंड मोठा #दुष्काळ पडल्यामुळे जिल्ह्यातील लाखभर माणसे मृत पावली होती किवां त्यांनी जिल्ह्यातून दुसरीकडे #स्तलांतर केले होते.
त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके होते.
औरंगाबाद, सिल्लोड, भोकरधन, जालना, पैठण, गंगापूर , वैजापूर , कन्नड, खुलताबाद व जहागिरी अंकित काही गावे
जिल्ह्यातील प्रमुख जातवार लोकसंख्या खालील प्रमाणे-
मराठा कुणबी 2,57,000, बंजारा 8,900 कोळी- 7000 मराठा होळकर 5,800 माळी-18,600 महार 66,800 मांग व चांभार 21,500 धनगर- 31,931 ब्राह्मण 28,491 वाणी- 4,600 मारवाडी- 7,800 ख्रिश्चन 2,673 मुस्लिम- 78,687
बिदर
जननेनुसार वर्ष एकूण लोकसंख्या
1881 – 7,88,827
1891 – 9,01,984
1901 – 7,66,129
तेव्हा बिदर जिल्ह्यामध्ये कारीमुंगी, बिदर, औराद, निलंगा, उदगीर, वारावल राजुरा, व जहागिरी अंतर्गत गावे अशी रचना होती.
जिल्ह्यातील प्रमुख जातींची #लोकसंख्या खालीलप्रमाणे
कुणबी तथा कापू 1,13,800 बनिया व वाणी 13,000
धनगर 52000 महार 68,000 मांग 60,000
पैकी आता निलंगा व उदगीर हे तालुके सध्याच्या लातूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट झाले आहेत.
1901 च्या लोकसंख्येप्रमाणे त्यांची संख्या खालीलप्रमाणे
तालुक्याचे नाव एकूण गावे लोकसंख्या
निलंगा 63 39,830
उदगीर 154 78,642
यावेळी या पत्रकार परिषेदमध्ये पुढील न्यूज चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Times of India: Mumbai Saam TV News Pudhari News18 Lokmat TV9 Marathi ABP Majha व इतर चॅनलचे प्रतिनिधी

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 163