जन संघर्ष न्यूज नेटवर्क
खंडाळा,तालुक्यातील शिरवळ पोलिस स्टेशन अंकित आसणाऱ्या एका गावामध्ये ५ वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचार करण्यात आला आसून. असे मनाला लज्जा होईल असे घृणास्पद कृत्य दोन अल्पवयीन मुलांनी केल्याचे आता उघड झाले आहे. मोबाईल मधील पॉर्न व्हिडिओ पाहून दोन अल्पवयीन मुलांनी त्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात मध्ये सदरील धक्कादायक घटना घडली. ही घटना सोमवार दिनांक १६ रोजी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. मात्र, त्या अगोदरच अल्पवयीन आरोपींनी पलायन केले होते. शिरवळ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संबंधित दोन्ही अल्पवयीन नराधम आरोपींना ताब्यात घेतले आहे.दोन ही कुटुंब ही बाहेरगावची असून, शिरवळ परिसरातील एका गावामध्ये ती दोन्ही कुटूंब भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि नराधम मुलं हे शेजारी शेजारी राहत आसून. पाच वर्षीय चिमूरडी ही संबंधित मुलांकडे खेळायला जात असे. रविवार दिनांक १५ रोजी पीडित मुलगी आणि आरोपी मुलं ही एकत्र खेळत असताना पीडित मुलीला आरोपीने आपल्या घराच्या टेरेसवर नेत मोबाईल मधील पॉर्न क्लिप पाहत अत्याचार केला आहे.
सदरील आपल्या बरोबर घडलेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर, तिच्या आईने याबाबत शिरवळ पोलिसांना घटनेची माहिती दिली, घडलेली घटना ही अतिसंवेदनसील लक्षात घेत शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली व सदरील घटनेची तपासचक्र वेगने फिरवत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.अल्पवयीन मुलीच्या आईने शिरवळ पोलिस स्टेशनला सदरील मुलीबरोबर घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली असून, पोलीसांकडून विविध कलमांनुसार त्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला आहे, सदरील घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी भेट असून. पुढील घटनेचा तपास हा शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नयना कामठे यांनी केला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 166