जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
सातारा जिल्ह्यातील शिरवळ या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे, तेथील असणारे पांडवकालीन केदारेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला तसेच गावाचे ग्रामदैवत म्हणून ओळख असणारे अंबिका माता मंदिर इत्यादी ऐतिहासिक अशा वास्तू व मंदिरं येथे आहेत.तसेच ऐतिहासिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणून या गावाची ओळख आहे.

आज अनंत चतुर्थी दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून घरगुती गणपतींच्या विसर्जनास सुरुवात झाली होती,त्यानंतर सायंकाळी सहा वाजले पासून मोठ्या मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली यामध्ये प्रामुख्याने भोईराज तरुण मंडळाचा गणपती , केदारेश्वर तरुण मंडळाचा गणपती, बाजारपेठ तरुण मंडळाचा गणपती, भैरवनाथ तरुण मंडळाचा गणपती, सत्यज्योत तरुण मंडळाचा गणपती तसेच इतर छोट्या- मोठ्या मंडळांचे गणपती हे या मिरवणुकीमध्ये आपल्या नंबर प्रमाणे सहभागी झाले होते या सर्व मिरवणुकांमध्ये ढोल, ताशा , पारंपारिक खेळ व डिजेंचा सहभाग हा प्रामुख्याने होता.
बाजारपेठ तरुण मंडळाने यावर्षी भव्यदिव्य असा स्वामी समर्थांच्या मूर्तीचा देखावा साकारला होता तो या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.या विसर्जन मिरवणुकीचे नियोजन हे ग्रामपंचायत शिरवळच्या मार्फत कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे केले होते त्यामध्ये नदीमध्ये कोणी निर्माल्य टाकू नये म्हणून सेपरेट कचराकुंड्यांची सोय करण्यात आली होती, तसेच नदीकाठी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने गणपतीचे विसर्जन करण्यासाठी नावेची सोय करण्यात आली होती फक्त भाविकांनी पाण्यात मुर्ती बुडवून ती त्या नावे मधील कर्मचाऱ्यांकडे दिल्यानंतर ते कर्मचारी नदीच्या मध्यभागी मुर्तींचे विसर्जन करत होते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हे विसर्जन स्थळी पूर्ण दिवस तसेच शेवटच्या मंडळाचा गणपती विसर्जन होईपर्यंत थांबून होते तसेच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी मोठ्या प्रमाणात या विसर्जन मिरवणुकी वेळी पोलीसांचा चोख असा बंदोबस्त ठेवलेला होता,त्यामुळे कोणतेही गालबोट न लागता विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 174