जनसंघर्ष न्यूज टीम
भोर,तालुक्यातील मोरवाडी या गावामधील नवतरुण गणेश मंडळानी दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सवा निमित्त वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते त्यानूसार या वर्षी गणेश चतुर्थी दिवशी गणरायाच्या आगमन निमित्त भव्य अशा ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यानंतर विधीवत पने गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली, त्यानंतर लहान मुलांसाठी तसेच खास करुन महिलांसाठी लिंबू चमचा, संगीत खुर्ची, गाण्याच्या भेंड्या, इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा नव तरूण मंडळाकडून आयोजीत करण्यात आल्या होत्या,
तसेच तालुकास्तरीय, राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गावातील ज्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान अशी कामगिरी केली आहे त्यांचा मान्यवरांचा हस्ते गौरवण्यात आले, या गौरव प्रसंगी मा. सौ. ज्योती दिपक मोरे (सरपंच) मोरवाडी, मा.श्री डॉ. मंदार सुरेश माळी, तसेच उपसरपंच मा.श्री. संतोष भाऊ मोरे तसेच भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.महेशजी टापरे आणि गावातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच नव तरूण मंडळाचे (NTM BOYS) चे सर्व कार्यकर्ते आणि आजी, माजी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार इत्यादी जन यावेळी उपस्थित होते,
तसेच दरवर्षी प्रमाणे असाच कार्यक्रम नवतरुण मंडळ आयोजित करत असते आणि नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करत असते.
आणि नवतरुण मंडळाचा गणपती उत्सव हा सहा दिवस असतो तसेच गौरी विसर्जनाला श्रींची शाही मिरवणुक सोहळा गुरुवार दिनांक , १२ सष्टेंबर रोजी गणेश भजनी मंडळ व गावातील पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात तसेच खास करून तरुणांसाठी डिजेच्या जल्लोषात मिरवणूक सोहळा पार पडला.
तसेच तालुक्याला हेवा वाटेल असे आणि गावाला एक चांगला प्रकारचा संदेश मिळेल या उद्देशानेचं हे मंडळ नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे राबवत असतं, आता पुढे येणाऱ्या गणेश जयंतीला जानेवारी २०२५ रोजी नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मंडळाकडून आयोजीत करण्यात आला आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे, तसेच डॉ.श्री.मंदार माळी यांनी मंडळाला विशेष असे सहकार्य केल्याबद्दल डॉ.श्री मंदार माळी यांचा नवतरूण मंडळाकडून विशेष अशा पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 153