हैद्राबाद गॅझेट अंमलबजावणीचे श्रेय कोणीही घेऊ नये- मनोज जरांगे पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जन संघर्ष न्यूज टीम
राज्यातील मराठा समाजाने आपला हक्क मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे. “कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गोरगरीब मराठ्यांचेच आहे,” अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचालीवर घेतली.ते म्हणाले, हैद्राबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवर बोलताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, या गॅझेटचे श्रेय फक्त गोरगरीब मराठ्यांचे आहे आणि हे यश देखील त्यांचेच आहे. तसेच त्यांनी जोरदार इशारा दिला की, मुख्यमंत्र्यांनी, छत्रपती संभाजीनगर च्या पालकमंत्री व खासदारांनी मराठा समाजाच्या अपेक्षांशी दगा फटका करू नये. ते अंतर वाली सराटी येथे काल दुपारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट हा विषय काही नवीन नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत यावर जरांगे म्हणाले. ”या हालचाली ३ महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या होत्या आणि आम्ही यावर आधीपासूनच लक्ष ठेवले आहे,” असे ते म्हणाले. या गॅझेट च्या अंमलबजावणीमुळे सर्व मराठ्यांना मोठा फायदा होणार आहे. शंभूराज देसाई तीन महिन्यांपासून यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु मराठा समाज एवढ्यावर थांबणार नाही. “आम्हाला केवळ आश्वासन नको आहे, आम्हाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर सोमवारी रात्री १२ वाजेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला आहे.
मराठा आरक्षणबाबत राज्यात सुरू असलेल्या विविध आंदोलने आणि त्यांच्यावर होणाऱ्या राजकीय हालचालींवर जरांगे पाटील म्हणाले, “राज्यात कोणालाही आंदोलनाचा अधिकार आहे, परंतु माझ्या मराठ्यांना खरचटले देखील नाही पाहिजे.” आमच्या मराठ्यांना गाल बोट लागता कामा नये असे स्पष्ट करत जरांगे यांनी शासनाने राजेश्री उंबरे यांना काय आश्वासन दिलय ते त्यांनाच माहिती असे भाष्य केले. तसेच लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणावर भाष्य करताना जरांगे म्हणाले की, उपोषण हा प्रत्येकाचा अधिकार आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai