लोणंद–शिरवळ महामार्गाचा विस्तार मार्गी; ५३८ कोटींच्या प्रकल्पाचे गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
सातारा, ता.७ : सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या लोणंद–शिरवळ तसेच लोणंद–सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीच्या दुरुस्ती व विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ शनिवार, ९ मे रोजी सकाळी १० वाजता शिरवळ येथे होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत लोणंद–शिरवळ मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असून, लोणंद–सातारा मार्गाचे दुपदरीकरण पेव्हड् शोल्डरसह केले जाणार आहे. एकूण ७२.८७ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी सुमारे ५३८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि गतिमान होणार असल्याची अपेक्षा आहे.
कार्यक्रमास सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हेही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार उदयनराजे भोसले, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राज्यसभा खासदार नितिन जाधव (पाटील) यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभणार आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील), जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हेही उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला विधानसभेचे आमदार महेश शिंदे, आमदार अतुलबाबा भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, जयंत आसगांवकर, रामराजे नाईक निंबाळकर, अरुण लाड यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
शिरवळ येथील पंढरपूर फाटा, राष्ट्रीय महामार्ग ४८ व ९६५ डी.डी. जंक्शन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक, व्यापारी तसेच ग्रामीण भागांतील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार असून, अपघातांचे प्रमाण घटण्यासही मदत होणार आहे.
एकूणच, या महामार्ग प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक नागरिकांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!