चितेची राख थंडही नाही… आणि सत्तेची गणितं मांडणाऱ्या पेड मीडियाचा निर्लज्ज खेळ!
जनसंघर्ष न्युज नेटवर्क
बारामती, ता.३०:अजितदादा पवार यांच्या चितेची राख अजूनही पूर्णपणे थंड झालेली नाही. पवार कुटुंबीय, कार्यकर्ते, लाखो समर्थक शोकसागरात असताना काही तथाकथित पेड पत्रकारिता करणाऱ्या माध्यमांनी मात्र संवेदनशीलतेला तिलांजली देत सत्तेची स्पर्धा सुरू केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?”, “उपमुख्यमंत्री कोण होणार?” अशा मथळ्यांची अक्षरशः मॅच लावून हे मीडिया घराणी निर्लज्जपणे बातम्या चालवत आहेत.
शोककाळात शांतता, संयम आणि माणुसकी अपेक्षित असताना, मीडियाकडून आकलेचे तारे तोडण्याचा उद्योग सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अजूनही पवार कुटुंबीय या अपार दुःखातून सावरत असताना, राजकीय वारसदारांची चर्चा करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हा पत्रकारितेचा नव्हे, तर भिकारचोटपणाचा कळस असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
ज्या पवार कुटुंबाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले, त्या कुटुंबाच्या दुःखाचा आदर राखण्याऐवजी काही माध्यमे केवळ टीआरपी आणि राजकीय अजेंड्यासाठी मृत्यूवर राजकारण करत आहेत. शरदचंद्र पवार ते अजित पवार या नेतृत्वाने महाराष्ट्रातील शेतकरी, कारखानदार, व्यापारी, नोकरदार यांच्यासाठी रोजगारनिर्मितीचा पाया घातला. पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा यांसारख्या शहरांत एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग, रोजगार आणि विकासाला चालना देण्याचे ऐतिहासिक काम या दोन्ही नेतृत्वाने केले.
आज त्याच परंपरेचा, त्याच कर्तृत्वाचा विसर पडावा आणि केवळ सत्तेच्या खुर्च्यांची चर्चा व्हावी, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखावर मीठ चोळणाऱ्या या पेड मीडिया व काही राजकीय नेत्यांचा जनतेने जाहीर निषेधच केला पाहिजे, अशी भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे.
मृत्यूवर राजकारण करणाऱ्या, शोककाळात स्पर्धा लावणाऱ्या या मीडियाला व राजकीय नेत्यांना जनतेची चपराक कधी मिळणार? हा प्रश्न आज प्रत्येक संवेदनशील महाराष्ट्रवासीयांच्या मनात घर करून बसला आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 80,162









