अल्पवयीन मुलीची छेडछाड ; जाब विचारणाऱ्या पालकांना घरात घुसून मारहाण – बारामतीत जय जरांगेसह तिघांवर गुन्हा!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
बारामती, ता.४ : अल्पवयीन मुलीची सतत छेड काढणाऱ्या टोळक्याला पालकांनी जाब विचारताच संतापाच्या भरात घरात घुसून मारहाण… बारामती एमआयडीसी परिसरात हा थरारक प्रकार घडताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे. जय जरांगे, आदित्य दातखिळ, स्वप्नील पावणे यांच्यासह चौथ्या साथीदाराविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात पॉक्सोसह गंभीर गुन्हे दाखल झाले असून एका आरोपीला पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे. उर्वरित आरोपी फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षणाच्या निमित्ताने बारामतीत राहणाऱ्या कुटुंबातील तेरा वर्षांची मुलगी बाहेर पडताच काही मुलांचे टोळके तिला खानाखुणा करणे, बोलावणे, मोबाईल नंबर किंवा इन्स्टा आयडी मागणे असा त्रास देत होते. पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांकडे सांगताच त्यांनी संबंधित मुलांना जाब विचारला. पण हा जाब विचारल्याचा राग मनात ठेवून आरोपींनी थेट दहशतीचा मार्ग धरला.
संध्याकाळच्या सुमारास आरोपी जय जरांगे सह त्याच्या तीन साथीदारांसह मुलीच्या घरात घुसले. त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत एका आरोपीला जेरबंद केले. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबविण्यात येत आहे.
“मुलींच्या छेडछाडीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा नराधमांना कायदा वेगाने आणि कडक धडा शिकवेल,” असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.
एमआयडीसी परिसरात अल्पवयीन मुलींवरील वाढत्या छेडछाडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवून कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अशी जोरदार मागणी होत आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!