जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
कोल्हापूर (दि.८ऑगस्ट ) – राज्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गौरवण्यासाठी ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी यंदा अंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेती रेखा धनगर-नरुटे यांची विशेष सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
हा भव्य पुरस्कार समारंभ राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून 29 ऑगस्ट 2025 रोजी, दुपारी 2 वाजता कोल्हापूर येथील राजश्री शाह छत्रपती सांस्कृतिक भवन, दसरा चौक येथे संपन्न होणार आहे.
‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार’ हे राज्यातील सर्वोच्च दर्जाचे क्रीडा सन्मान असून, दिल्ली गव्हर्नमेंट पॅरामेडिकल बोर्ड आणि कालिराम फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
या गौरवासाठी रेखा धनगर-नरुटे यांना हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, राज्यातील क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष निमंत्रक प्रमुख प्रा. नितीन शिंदे (NIS, कोच) आणि प्रा. अमोल साठे (NIS, कोच) हे असून, कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 176