जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर :- इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चांदगुडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, म्हसोबाचीवाडी येथील चांदगुडे वस्तीवर एस.टी. बस थांब्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांना तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चांदगुडे वस्ती ही म्हसोबाचीवाडी परिसरातील एक महत्त्वाची वस्ती असून येथे गेल्या अनेक वर्षांपासून एस.टी. बस थांब्याची मागणी होत होती. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. ही गरज ओळखून संदीप चांदगुडे यांनी एस.टी. महामंडळाचे संबंधित अधिकारी व स्थानिक प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर हा थांबा अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे वस्तीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी संदीप चांदगुडे यांचे आभार मानले आहेत. ही सुविधा ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह