जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर, ता.१२ :-देशभक्तीची भावना जागृत करणारे ‘हर घर तिरंगा’ अभियान म्हसोबाचीवाडीत दिमाखात साजरे होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अधिक तेजस्वी करण्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत ग्रामपंचायतीत ध्वजारोहण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ उद्या, 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता होणार असून, तिरंग्याच्या साक्षीने गावातील प्रत्येक घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे.
ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी ग्रामस्थांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
“आपला तिरंगा फक्त कापडाचा तुकडा नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान, शौर्याची कहाणी आणि बलिदानाची आठवण आहे,” असा संदेश देत ग्रामपंचायत म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर, जि. पुणे यांनी या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
गावकऱ्यांच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य ज्वाला प्रज्वलित करणारा हा उत्सव, स्वातंत्र्याच्या सुवर्णपानांना उजाळा देणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 43