जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
दिल्लीः ( दि.५) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी, समारोप झाला. दिल्लीच्या एकूण ७० विधानसभा जागांसाठी होणारी ही निवडणूक अत्यंत रोमांचक राहिली. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते, आणि त्यांचे नशीब ईव्हीएम मध्ये कैद झाले आहे. येत्या शनिवार, ८, फेब्रुवारीला रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
एक्झिट पोलचे अंदाज काय आहेत.
मतदानानंतर विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेमधून एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला दिल्लीत ३५ ते ४० जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे, तर आम आदमी पार्टीला ३२ ते ३७ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बाबतीत, त्यांना ० ते केवळ १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार, आप ला २५ ते २८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला २ ते ३ जागांवर समाधान मानावे लागेल. भाजप मात्र मोठी मुसंडी मारताना दिसत आहे, त्यांना ३९ ते ४४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
डिव्ही रिसर्चच्या पोलनुसार, भाजपला ३६ ते ४४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर आप ला २६ ते ३४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळणार नाही, असा अंदाज आहे.
पिपल्स इनसाईट्सच्या अंदाजानुसार, आप ला २५ ते २९ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला ४० ते ४४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ० ते १ जागेवर समाधान मानावे लागेल.
पोल डायरीच्या अंदाजानुसार, भाजपला ४२ ते ५० जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर आप ला २६ ते ३४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ० ते २ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
जेवीसीच्या पोलनुसार, भाजपला ३९ ते ४५ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, तर आप ला २२ ते ३१ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ० ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे.
निवडणुकीची प्रमुख लढत
दिल्लीत विधानसभा निवडणुकीत खरी लढत ही आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. आप ने या निवडणुकीत आपलं अस्तित्व अबाधित राहावं यासाठी प्रचंड प्रयत्न केले. भाजप आणि काँग्रेसने देखील प्रचंड ताकद लावली. याशिवाय बसपा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने देखील काही जागांवर निवडणूक लढवली, ज्यामुळे या निवडणुकीला प्रचंड रंगत आलेली पहायला मिळाली.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह