जनसंघर्ष न्यूज / संपादक – संजय चांदगुडे
इन्सटाग्रामवरती केलेल्या मॅसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खुन , मौजे अंथुर्णे, ता. इंदापुर येथील घटना, खुन करणा-या इसमास वालचंदनगर पोलीसांनी केले पाच तासात जेरबंद….
इंदापूर :- दि.०३ मे रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास मौजे अंथुर्णे, ता. इंदापुर येथील आकाश मुशा चौगुले, (वय२२वर्षे ) हा त्याच्या कुटूंबासह घरी असताना त्याच्या मोबाईल मधील इन्सटाग्राम वरती त्यांचा नातेवाईक आसणारा राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार, रा. मौजे अंथुर्णे याने त्याच्या इन्सटाग्रामवर केलेल्या मॅसेजचा जाब विचारण्यासाठी आकाश मुशा चौगुले व त्याची आई शांतबाई चौगुले हे राजेश पवार याच्याकडे त्याच्या मौजे अंथुर्णे येथील घरी गेले असता. त्याचवेळी आकाश चौगुले याने राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार याला “तु माझ्या बहिणीचा फोटो इन्सटाग्राम वरती मॅसेज व्दारे मला का पाठविला” याबाबत विचारणा केली असता त्याचाच राग मनता धरुन राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार याने त्याच्या हाताने आकाश चौगुले याचा जोरात गळा पकडुन व दाबुन त्याला उचलुन त्याच्या घरासमोर असलेल्या मोकळया जागेमध्ये पडलेल्या दगडावर जोरात आपटले. त्यावेळी आकाश चौगुले हा निचपीत पडल्याचे पाहुन त्याचा धरलेला गळा सोडुन राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार हा तिथुन त्याच्या दोन चाकी गाडीवरुन कोणला काही समजायच्या आतमध्ये पळुन गेला होता.
त्यानंतर इसमास उपचारकामी त्याच्या घरातील नातेवाईकांनी देसाई हॉस्पीटल, लासुर्णे, ता. इंदापुर येथे ॲडमिट केले असता तो उपचारापुर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी रात्री ९:५० वाजता घोषित केले. त्यानंतर सदर घडलेल्या घटनेची माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांना प्राप्त होताच त्यांनी पोलीस स्टाफसह लागलीच घटनास्थळी भेट देवुन घडलेल्या घटनेची संपुर्ण माहिती घेतली.
त्यानंतर सदर घटनेची माहिती मा. पोलीस अधिक्षक साो, पुणे ग्रामीण तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक साो, पुणे विभाग व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, बारामती उपविभाग यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शन व सुचने प्रमाणे मारहाण करणाराआरोपी याचा शोध घेण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळी तीन पथके तयार करुन बारामती व इंदापुरच्या दिशेने रवाना केले. त्यावेळी सदर आरोपीचा शोध घेत असताना तो कडबनवाडी, ता. इंदापुर गावचे हद्दीमधील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये लपुन बसल्याची गोपनीय माहिती बातमीदार यांच्या मार्फत प्राप्त होताच सदर आरोपीचा मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पोलीस स्टाफ यांना पाठवुन त्याचा शोध घेतला असता सदर आरोपी हा पोलीस आल्याची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेवुन पळु जावु लागला. त्यावेळी सदर आरोपीचा मोठ्या शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर सदर आरोपीस वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणले. त्यावेळी सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नावे राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार, वय २१ वर्षे, रा. मौजे अंथुर्णे, ता. इंदापुर, जि. पुणे असे सांगितले.
सदर घटनेच्या अनुषंगाने घटनेमधील प्रत्यक्षदर्शी व मयत इसम याची आई नामे शांताबाई मुशा चौगुले रा. मौजे अंथुर्णे, ता. इंदापुर यांच्याकडे सविस्तर चौकशी करुन त्यांची लेखी फिर्याद घेवुन गुन्हा रजि. नंबर १४५/२०२५ बी.एन.एस १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास हा विजय टेळकीकर, पोलीस उप-निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. पंकज देशमुख साो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. रमेश चोपडे साो, अपर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग, मा.श्री. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार डुणगे सहा. पोलीस निरीक्षक, विजय टेळकीकर पोलीस उप-निरीक्षक तसेच पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्र्य चांदणे, जगदीश चौधर, विकास निर्मळ, पोलीस अंमलदार अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव यांनी पार पाडली आहे.
सदर कामगिरीबाबत वरिष्ठांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे व ठाणे अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 824