एकाच कुटुंबातील २ महिलांना मिळणार ; मोफत गॅस सिलेंडर पात्रता निकष काय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे :- केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये सन २०२५ मध्ये एक क्रांतिकारी बदल करण्यात आला आहे. या नवीन निर्णयानुसार, आता एकाच कुटुंबातील ज्यांची रेशनकार्ड विभक्त आहेत अशा 2 महिलांना स्वतंत्रपणे मोफत उज्वला योजनेचे एलपीजी कनेक्शन मिळू शकते. हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी आशेचा किरण आहे, ज्यांना अनेक वर्षांपासून स्वयंपाकासाठी लाकूड, गोवर्‍या आणि इतर गोष्टींवर अवलंबून राहावे लागत होते.

सुरवातीला ही योजना बीपीएल मध्ये समाविष्ट असणाऱ्या कुटुंबां पुरती मर्यादित होती, परंतु नंतर तिचा विस्तार करून अन्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्रसरकारद्वारे खुली करण्यात आली. २०२० च्या कोविड-१९ या महामारी दरम्यान, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३ मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले होते, जेणेकरून आर्थिक संकटात त्यांना मदत होईल.

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात ही मे २०१६ मध्ये करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश हा होता की, गरीब व निर्धन कुटुंबातील महिलांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन म्हणजेच एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणे हाच उद्देश होता. पारंपारिक इंधनांच्या वापरामुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम कमी करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते.

२०२५ मध्ये केंद्र सरकारकडून करण्यात आलेले नवीन बदल – कुटुंबातील २ महिलांना मिळणार आता एलपीजी कनेक्शन

२०२५ मध्ये केंद्रसरकारकडून करण्यात आलेला सर्वात महत्त्वपूर्ण बदल म्हणजे एकाच कुटुंबातील २ महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी, एकाच कुटुंबातील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ हा मिळत होता . भारतात अनेक अशी संयुक्त कुटुंबे आहेत, जिथे एकाच छताखाली अनेक लहान कुटुंबे राहतात. अशा परिस्थितीत, दोन स्वतंत्र स्वयंपाकघरं असून ही केवळ कुटुंबातील एकाच महिलेला एलपीजी गॅस कनेक्शन मिळत होते.

परंतु आता, यापुढे जर एका कुटुंबातील दोन महिला वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असतील किंवा एकाच घरात परंतु स्वतंत्र स्वयंपाकघर असतील, तर त्या दोघींनाही स्वतंत्रपणे उज्ज्वला योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी या दोन्ही महिलांकडे स्वतंत्र रेशन कार्ड, आधार कार्ड आणि अन्य आवश्यक ओळखपत्रे असणे गरजेचे आहे.

 आई-मुलगी सासू -सून होणार योजनेची लाभार्थी

या घेण्यात आलेल्या नवीन निर्णयामुळे विशेषतः सासू-सून, आई-मुलगी, बहिणी किंवा अन्य नातेसंबंध असलेल्या महिलांना याचा फायदा होणार आहे. संयुक्त कुटुंब पध्दतीमध्ये, अनेकदा सासू आणि सून दोघींना वेगवेगळे स्वयंपाक बनवावे लागतात. आता दोघींनाही स्वतंत्र एलपीजी कनेक्शन मिळू शकते, ज्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन सुलभ आणि सुखकर होणार आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool