जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे : आम्ही गरजवंत असताना सुद्धा आम्हाला घरकूल दिले जात नाही, तर या घरकुलांच्या यादीत नेहमी धनदांडग्यांची नावचं आसतात, तसेच सरपंचांनी, व ग्रामविकास अधिकारी यांनी आमचे नाव या यादीतून वगळले, अशी ओरड ही नेहमी होत असते. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उभे राहिल्याचे पहावयास मिळाले आहे मात्र आता ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने घरकुलासाठी लाभार्थ्याकडून होणारी ओरड आता कायम स्वरूपी बंद होणार आहे. कारण केंद्र सरकारने ज्या लाभार्थ्यांना घरकूले मिळाली नाहीत, अशांना आवास प्लस 2024′ हे ॲप लॉन्च करण्यात आले आहे तसेच या ॲपला आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून अगदी सहजपणे आपल्याला घरकुलासाठी अर्ज करता येणार आहे व आपल्या हक्काचं घरकूल यापुढे मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून सन 2024-25ते 2028-29 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये दोन कोटी घरं बांधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे , सन 2018 मध्ये झालेल्या घरकुलांच्या सर्वेक्षणाची मोठ्या प्रमाणात ओरड होती. प्रतीक्षा यादीतील किंवा सिस्टीमद्वारे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना या घरकुलांचा लाभ हा देण्यात येणार आहे. ज्यांनी घरकुलाचा लाभ यापूर्वी घेतला नाही आणि जे कच्या घरात राहत आहेत, अशा लाभार्थ्यांना या घरकुलांचा लाभ हा दिला जाणार आहे. त्यामुळे घरकूल आम्हाला मिळाले नाही, अशा प्रकारची ओरड ही कायमची थांबणार आहे.
आपल्याला या घरकूलाचा लाभ घ्यायचा असेल, तर ‘आवास प्लस 2024 या ॲपवर जाऊन दि. 1 एप्रिल 2025 पासून यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच त्या अर्जाची चाचणी होणार आहे. तसेच अशा प्रकारचे अर्ज केवळ ग्रामीण भागातील नागरिकच करू शकणार आहेत. आपल्या गावातील ग्रामपंचायत अधिकारी हा या घरकुलांचा सर्वेअर राहणार आहेत. तसेच नागरिकांनी ‘आवास प्लस 2024 या ॲपवर स्वतः जाऊन अर्ज करावा लागणार आहे किंवा आपल्या गावातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून अर्ज करावा. त्यामध्ये पात्र असलेल्या आणि अचूक माहिती भरणाऱ्या नागरिकांना या घरकुलांचा लाभ हा मिळणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह