जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- संपूर्ण राज्यात मार्तंड मल्हार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संस्थानवर आरोप लावण्यात आला होता की, सरकारकडून घेण्यात आलेल्या श्री मल्हार झटका मटण या नावाला देवस्थान ट्रस्टचा विरोध आहे, परंतू संस्थानच्या वतीने एक पत्रक काढून त्यामध्ये देवस्थानचा यासाठी कोणत्याही प्रकारचा विरोध नाही म्हणून सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच श्री मल्हार झटका मटन सर्टिफिकेशन वेबसाईटचे उद्घाटन करून हिंदू जनतेने हलाल मटणाच्या ऐवजी आता झटका मटणच घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यानंतर काही तासातच या सर्टिफिकेशन मधील मल्हार या नावाला श्री देव मल्हार संस्थान जेजूरी चे एक विश्वस्त आक्षेप घेत असल्याबाबत वृत्त प्रसारित झाले होते. परंतु आता श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी या मंदिर व्यवस्थापन समितीने आपले खुलाशाचे पत्र प्रकाशित करून अशा प्रकारचा विरोध नसल्याचे आता जाहीर केले आहे. यामुळे झटका मटन सर्टिफिकेशनला वादाच्या भोवऱ्यात अडकवणाऱ्यांची चांगलीच पंचायत झाल्याचे दिसत आहे ! सोबत संस्थानचे पत्र हे देण्यात येत आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह