कायद्याचा रक्षकचं झाला भक्षक ; महिला दिनीचं पोलीस अंमलदाराचा महिलेवर अत्याचार .!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
 बीड:- पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर झालेले बलात्काराचं प्रकरण ताजे असतानाच. व या घडलेल्या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. त्यातचं आता बीड मधून आणखी एका अत्याचाराची घटना घडल्याची धक्कादायक घटना आता समोर आल्याचं पहावयास मिळत आहे. यामध्ये कायद्याचा रक्षकचं भक्षक झाल्याचे दिसत आहे. एकीकडे सर्व ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत होता त्याचवेळी या दिवशीचं एका पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणात आरोपीला पोलीसांनीताब्यात घेतले आहे. तसेच पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार , पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावले होते आणि पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असणाऱ्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. सदरील महिला बसने पुण्याहून बीडकडे येत असताना तिला बसमधून खाली उतवून आरोपी गडकरने तिच्यावर बलात्कार केला.
पीडित महिला तिच्या कामा निमित्त पाटोदा पोलीस ठाण्यात येत होती. त्याच दरम्यान ती ठाणे अंमलदार उद्धव गडकर यांच्या संपर्कात आली होती. त्या दोघात त्यांच्या फोन नंबरची देवाणघेवाण ही झाली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू तुझ्यावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत आरोपीकडून पीडितेवर वारंवार अत्याचार सुरु ठेवले होते.
फिर्यादी पिडित महिलेकडून सदरील घटना ही दुपारी १ वाजेच्या वेळेमध्ये घडल्याचे पोलिसांना सांगितलं. तसेच पाटोदा पोलीस ठाण्यात जाऊन या महिलेकडून पोलीस निरीक्षक यांच्या समोर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या आरोपी विरुद्ध कारवाई होईपर्यंत ती पोलीस ठाण्यात बसूनचं होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. तसेच ठाणे अंमलदार उद्धव गडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें