अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने आईकडून , मुलाच्या हत्येची सुपारी.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

सातारा:-  सातारा जिल्ह्यात एक अत्यंत चकित करणारी घटना उघडकीस आली आहे, ज्यात एका आईने आपल्या प्रियकरासह स्वतःच्या मुलाच्या खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे. 29 जानेवारी 2025 रोजी वराडे गावच्या हद्दीत एक निनावी व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत सापडल्याने पोलिसांना घटनास्थळी जावे लागले.

वराडे पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून जखमी व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमीच्या डोक्यात आणि डोळ्यांमध्ये गंभीर जखमा झाल्याचे आढळले आणि त्यानंतर त्याला सातारा येथून कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले.

पोलिसांनी सोशल मिडियाच्या मदतीने जखमी व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याचे नाव प्रशांत महादेव शेंडगे (वय 24, रा. शिवडे, ता. कराड) असल्याचे निष्पन्न झाले. प्रशांतच्या भाऊ आणि आई पुणे येथे राहत असल्याचे समजल्याने पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत अधिक माहिती घेतली.

तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रशांतची आई शोभा महादेव शेंडगे (वय 38, मुळ रा. सांगवी, ता. हवेली जि. पुणे) आणि तिचा प्रियकर जयेंद्र गोरख जावळे (वय 40, मुळ रा. सांगवी, ता. हवेली जि. पुणे) यांचे अनैतिक संबंध होते. प्रशांताच्या व्यसनाधिनतेमुळे शोभाला त्रास होत असल्याने जयेंद्र आणि शोभाने प्रशांतचा खून करण्याचा कट रचला.

जयेंद्रने आपल्या दोन साथीदार सिद्धार्थ विलास वावळे (वय 25, मुळ रा. मातोश्रीनगर, जि. परभणी) आणि अकबर मेहबुब शेख (वय 25, रा. निकाळजे वस्ती, ता. हवेली जि. पुणे) यांच्या मदतीने प्रशांत यास उंब्रज येथे रिक्षात घेतले आणि वराडे येथील शेतात नेले. तिथे त्यास दारू पाजून दगडाने ठेचून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रशांतचा जीव वाचला.

पोलिसांनी तत्परतेने तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आणि 24 तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणला. गुन्ह्याचा पुढील तपास तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले करीत आहेत.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें